कानात किडा जाणे –
काहीवेळा कानात किडा जाऊ शकतो. विशेषतः झोपेत असताना कानात किडा जाऊ शकतो. कानात किडा गेल्यास कानात दुखू लागते. अशावेळी कानात गेलेला किडा कसा काढायचा असा अनेकांना प्रश्न पडतो. यासाठी या लेखात कानात किडा गेल्यावर कोणते घरगुती उपाय करावे याविषयी माहिती सांगितली आहे.
कानात किडा गेल्यावर करायचे घरगुती उपाय –
- कानात किडा गेल्यास मोहरीचे तेल कोमट करून त्याचे काही थेंब कानात घालावे.
- कानात किडा गेल्यास पाण्यात सैंधव मीठ मिसळून त्याचे काही थेंब कानात घालावे.
- कानात किडा गेल्यास तुरटी तेलात घालून ते तेल कानात घालावे.
- कानात किडा गेल्यास समईतील गरम तेल कापसाच्या बोळ्याच्या साहाय्याने कानात घालावे.
कानात किडा गेल्यास काय करावे..?
कानात किडा गेल्यास कानात बोटे किंवा काडी घालून किडा काढण्याचा प्रयत्न करू नये. कारण यामुळे किडा हा कानात आणखी आत जाण्याची शक्यता असते.
घरगुती उपाय करून देखील जर कानातील किडा बाहेर न निघाल्यास कानाच्या डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.
हे सुध्दा वाचा – कान दुखणे यावरील उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about How to Remove a Bug from Ear. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.