दातातून रक्त येण्याची कारणे व हिरड्यातून रक्त येणे यावर उपाय

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Bleeding gums treatment in Marathi, teeth bleeding solution in Marathi, Bleeding gums: Causes, Symptoms and Home remedies in Marathi.

दातातून रक्त का येते –

अनेक कारणांमुळे हिरड्यांतून रक्त येत असते. यामध्ये तोंडातील अस्वच्छता, हिरड्यातील बॅक्टेरिअल इन्फेक्शन, दातांचीमुळे सैल झाल्याने, दात किडल्यामुळे तसेच पायरिया हा दात व हिरड्यांसंबंधित आजार झाल्यानेही हिरड्यातून रक्त येऊ शकते. दातातून रक्त येत असल्यास त्याठिकाणी वेदना होते तसेच अन्न चावताना जास्त त्रास होत असतो.

दातातून रक्त येण्याची कारणे :

• हिरड्या व दातांवरील बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे,
• हिरड्यांना आलेली दीर्घकालीन सूज – पायोरियामुळे (Pyrohoea),
• ब्रशमुळे हिरड्यांना दुखापत झाल्यामुळे किंवा अयोग्य पद्धतीने प्लॅसिंग करण्यामुळे,
• ऍस्पिरिन सारख्या काही ठरावीक औषधांमुळे,
• आहारातील ‘क’ जीवनसत्त्वाचा अभाव असल्यास,
• रक्तातील प्लेटलेट्सच्या) कमतरतेमुळे,
• ल्युकेमिया किंवा रक्ताचा कर्करोग झाला असल्यास,
तसेच प्रेग्नन्सीमध्ये हार्मोन्समधील बदलामुळेही हिरड्यातून रक्त येऊ शकते.

हिरड्यातून रक्त येऊ नये म्हणून ही काळजी घ्या..

• तोंडाची स्वच्छता ठेवावी.
• दिवसातून सकाळी व रात्री असे दोनवेळा दात घासावेत.
• चुकीच्या पद्धतीने दात स्वच्छ करू नका व फार जोर देऊन दात घासू नये.
• आहारात ‘क’ जीवनसत्त्वयुक्त आवळा, लिंबूपाणी, संत्री, मोसंबी यासारख्या पदार्थांचा समावेश करा.
• मद्यपान, धूम्रपान, गुटखा, पानमसाला खाणे ताबडतोब बंद करा.
• काहीही खाल्ल्यानंतर चूळ भरा.
• मिठाच्या पाण्याने गुळणी करा. मिठामुळे जंतूंची वाढ थोपवली जाते.
• तोंड धुताना हिरड्यांना बोटाने चोळावे, त्यामुळे रक्तपुरवठा वाढतो.
• मिठाई व चॉकलेटस कमी प्रमाणात खावे व खाल्ल्यास लगेच दात घासा.

दातातून रक्त येणे यावर घरगुती उपाय –

योग्य आहार घ्या –
हिरड्यातून रक्त येत असल्यास आहारात ‘क’ जीवनसत्त्वयुक्त आवळा, लिंबूपाणी, संत्री, मोसंबी यासारख्या पदार्थांचा समावेश करा. तसेच कॅल्शियम असणारे दूध, दुधाचे पदार्थ खावेत.

लवंग –
लवंग तेल कापसाच्या बोळ्याने दुखणाऱ्या हिरड्यांच्या ठिकाणी लावल्यास त्यांतील इन्फेक्शन, सूज व दातांतून रक्त येणे थांबण्यास मदत होते.

पेरूची पाने –
पेरूची ताजी पाने चावत राहिल्याने हिरड्यांतून रक्त येणे थांबते व हिरड्या मजबूत होण्यास मदत होते.

मध आणि लिंबू रस –
अर्धा चमचा मधात 2 थेंब लिंबू रस मिसळून मिश्रण तयार करावे. हिरड्यांतून रक्त येत असल्यास बोटाने हे मिश्रण त्याठिकाणी लावावे.

मोहरीचे तेल आणि हळद –
मोहरीच्या तेलात हळद मिसळून मिश्रण तयार करावे. ह्या मिश्रणाने रोज रात्री झोपण्यापूर्वी हिरड्यांना हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे हिरड्या दुखणे, हिरड्यांतून रक्त येणे थांबते व हिरड्या मजबूत होण्यास मदत होते.

How to stop bleeding gums at home, tooth bleeding treatment in Marathi.

© कॉपीराईट सुचना -
कृपया ह्या वेबसाईटमधील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. येथील माहिती कॉपी करून आपल्या नावाने प्रसिद्ध किंवा शेअर किंवा Video बनवता येणार नाही.