अंगठा चोखणे (Finger or Thumb Sucking) :
अनेक लहान बाळांमध्ये अंगठा चोखण्याची सवय असते. लहानपणीची ही सवय काही मुलांमध्ये मोठे झाल्यावरही राहू शकते. अंगठा किंवा बोटे तोंडात घालण्याच्या सवयीमुळे इन्फेक्शन होण्याचीही शक्यता असते. यासाठी अंगठा चोखू नये म्हणून खालील उपाय आपण बाळ लहान असतानाच करू शकता.
अंगठा चोखण्याची सवय बाळाला असल्यास हे करा उपाय :
लहान बाळाला अंगठा चोखण्याची सवय असल्यास बाळाच्या हातात हातमोजे घालावेत त्यामुळे बाळाची अंगठे किंवा बोटे तोंडात घालण्याची सवय सुटण्यास मदत होईल. याशिवाय बाळाच्या हातात एखादे खेळणे दिल्यासही त्याची सवय सुटण्यास मदत होईल. याखेरीज बाळाच्या अंगट्याला कडुनिंबाचा पाला चोळल्यास कडू चवीमुळे बाळ अंगठा किंवा बोटे तोंडात घालणार नाही.
जर मुल मोठे असल्यास असल्यास त्याला त्याच्या सवयीविषयी समजून सांगावे. साधारणपणे बाळ 3 ते 4 वर्षाचे झाल्यावर आपोआप त्याची अंगठे चोखण्याची सवय कमी होत असते.
Last Medically Reviewed on February 16, 2024 By Dr. Satish Upalkar.