लहान बाळाचे लसीकरण (Vaccination) :
बाळांना नियमित लसीकरण केल्यामुळे बाळाचे अनेक आजारांपासून रक्षण होण्यास मदत होते. आपल्या लहान मुलास वेळच्यावेळी लसीकरण करणे ही एक सामाजिक जबाबदारी आहे. नवजात बाळापासून ते मुल मोठे होईपर्यंत कोणकोणत्या लसी दिल्या पाहिजेत याची माहिती खाली दिली आहे.
बालकाचे लसीकरण वेळापत्रक व तक्ता :
नवजात बाळाचे लसीकरण –
बाळ जन्मल्यावर लगेच पोलिओ, बीसीजी आणि हेपाटिटिस-B अशा तीन लसी दिल्या जातात.
- पोलिओ (0) – बाळाच्या तोंडात दोन थेंब पोलिओचा डोस दिला जातो. याला पोलिओचा झिरो डोस मानले जाते.
- बीसीजी लस – क्षयरोगापासून रक्षण करणारी ही लस डाव्या दंडावर देतात.
- हेपाटिटिस बी (1) – हेपाटिटिस बी ची पहिली लस बाळाच्या डाव्या मांडीत बाहेरील बाजूस दिली जाते.
दीड महिन्यानंतर –
बाळाला दीड महिना किंवा सहा आठवडे पूर्ण झाल्यावर खालील तीन लसी दिल्या जातात.
- पोलिओ (1) – बाळाला सहा आठवडे पूर्ण झाल्यावर पोलिओचा पहिला डोस दिला जातो. यामध्ये बाळाच्या तोंडात दोन थेंब पोलिओचा डोस दिला जातो.
- डी.पी.टी. (1) – याला ट्रिपल लस किंवा त्रिगुणी लस असेही म्हणतात. बाळाला सहा आठवडे पूर्ण झाल्यावर डी.पी.टी. चा पहिला डोस दिला जातो. यामध्ये बाळाच्या उजव्या मांडीच्या बाहेरील बाजूस लस टोचली जाते.
- हेपाटिटिस बी (2) – हेपाटिटिस बी ची दुसरी लस बाळाच्या डाव्या मांडीत बाहेरील बाजूस दिली जाते.
अडीच महिन्यानंतर –
बाळाला अडीच महिना किंवा दहा आठवडे पूर्ण झाल्यावर खालील तीन लसी दिल्या जातात.
- पोलिओ (2) – बाळाला अडीच महिना पूर्ण झाल्यावर पोलिओचा दुसरा डोस दिला जातो. यामध्ये बाळाच्या तोंडात दोन थेंब पोलिओचा डोस दिला जातो.
- डी.पी.टी. (2) – बाळाला अडीच महिना पूर्ण झाल्यावर डी.पी.टी. चा दुसरा डोस दिला जातो. यामध्ये बाळाच्या उजव्या मांडीच्या बाहेरील बाजूस लस टोचली जाते.
- हेपाटिटिस बी (3) – हेपाटिटिस बी ची तिसरी लस बाळाच्या डाव्या मांडीत बाहेरील बाजूस दिली जाते.
साडेतीन महिन्यानंतर –
बाळाला साडेतीन महिने किंवा 14 आठवडे पूर्ण झाल्यावर खालील दोन लसी दिल्या जातात.
- पोलिओ (3) – बाळाला साडेतीन महिने पूर्ण झाल्यावर पोलिओचा तिसरा डोस दिला जातो. यामध्ये बाळाच्या तोंडात दोन थेंब पोलिओचा डोस दिला जातो.
- डी.पी.टी. (3) – बाळाला साडेतीन महिने पूर्ण झाल्यावर डी.पी.टी. चा तिसरा डोस दिला जातो. यामध्ये बाळाच्या उजव्या मांडीच्या बाहेरील बाजूस लस टोचली जाते.
नऊ महिन्यानंतर –
जन्मल्यानंतर नऊ महिने पूर्ण झाल्यावर बाळाला खालील दोन लसी दिल्या जातात.
- गोवर – जन्मल्यानंतर नऊ महिने पूर्ण झाल्यावर ही लस बाळाच्या उजव्या दंडाच्या वरच्या बाजुला टोचली जाते.
- व्हिटॅमिन A – जन्मल्यानंतर नऊ महिने पूर्ण झाल्यावर व्हिटॅमिन A चा पहिला डोस बाळाला तोंडावाटे दिला जातो.
दीड ते दोन वर्षे पूर्ण झाल्यावर –
बाळाला दीड ते दोन वर्षे पूर्ण झाल्यावर खालील लसी दिल्या जातात.
- डी.पी.टी. (बू) – बाळाला दीड ते दोन वर्षे पूर्ण झाल्यावर डी.पी.टी. चा बूस्टर डोस दिला जातो. यामध्ये बाळाच्या उजव्या मांडीच्या बाहेरील बाजूस लस टोचली जाते.
- पोलिओ (बू) – बाळाला दीड ते दोन वर्षे पूर्ण झाल्यावर पोलिओचा बूस्टर डोस दिला जातो. यामध्ये बाळाच्या तोंडात दोन थेंब पोलिओचा डोस दिला जातो.
- गोवर बूस्टर – बाळाला दीड ते दोन वर्षे पूर्ण झाल्यावर गोवरचा बूस्टर डोस बाळाच्या उजव्या दंडाच्या वरच्या बाजुला टोचली जाते.
- व्हिटॅमिन A – बाळाला दीड ते दोन वर्षे पूर्ण झाल्यावर व्हिटॅमिन A चा दुसरा डोस बाळाला तोंडावाटे दिला जातो.
अडीच वर्षांनी –
व्हिटॅमिन A – बाळाला अडीच वर्षे (30 महिने) पूर्ण झाल्यावर व्हिटॅमिन A चा तिसरा डोस बाळाला तोंडावाटे दिला जातो.
तीन वर्षांनी –
व्हिटॅमिन A – बाळाला तीन वर्षे (36 महिने) पूर्ण झाल्यावर व्हिटॅमिन A चा तिसरा डोस बाळाला तोंडावाटे दिला जातो. तसेच बालकास पाच वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रत्येक सहा-सहा महिन्याने व्हिटॅमिन A चा डोस पाजावा.
पाच ते सहा वर्षे झाल्यावर –
डीटीपी बूस्टर – मुलाला पाच ते सहा वर्षे पूर्ण झाल्यावर डी.पी.टी. बूस्टर डोस दंडाच्या वरच्या बाजुला दिला जातो.
10 ते 16 वर्ष झाल्यावर –
टी.टी. – मुलाला 10 ते 16 वर्षे पूर्ण झाल्यावर धनुर्वाताचे इंजेक्शन दंडाच्या वरच्या बाजुला दिले पाहिजे.
लसीकरणासंबंधित महत्वाच्या सूचना :
- बाळाला पहिल्या वर्षात पाचवेळा लसीकरण करण्यासाठी घेऊन गेले पाहिजे.
- काही कारणांमुळे जर लसीकरण देण्याचे राहिले असल्यास बाळास शक्य तितक्या लवकर लसीकरणास घेऊन जावे.
- बाळ आजारी असल्यास त्याला ताप, सर्दी, खोकला, अतिसार होत असले तरीही बाळाला लसीकरणास घेऊन जावे.
हे सुद्धा वाचा –> बालसंगोपनविषयी सर्व माहिती जाणून जाणून घ्या..
Read Marathi language article about Vaccination schedule. Last Medically Reviewed on February 15, 2024 By Dr. Satish Upalkar.