नाकात फोड येणे – Pimple inside nose :
नाकपुडीच्या आतील भागात फोड किंवा बॉइल (Boils), पिंपल येत असतात. या त्रासाला ‘नाकात माळीण होणे’ असेही म्हणतात. प्रामुख्याने बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे आणि उष्णतेमुळे नाकात फोड येत असतात. नाकात फोड किंवा माळीण आल्याने त्याठिकाणी सूज येऊन खूप वेदना होतात.
नाकात माळीण होणे यावर घरगुती उपाय –
सुगंधी फुले –
नाकात माळीण उटल्यास मोगरा यासारख्या सुगंधी फुलाचा वास घेत राहिल्यास हा त्रास लवकर कमी होतो.
साजूक तूप –
माळीण उटल्यास नाकामध्ये साजूक तुपाचे काही थेंब घातल्यानेसुध्दा नाकातील फोड कमी होण्यास मदत होते. नाकात फोड आल्यास हे घरगुती उपाय उपयुक्त ठरतात.
नाकात फोड आल्यास अशी घ्यावी काळजी –
- नाकामधले येणारे फोड आपोआप बरे होतात.
- नाकात फोड झाल्यास ते फोड नखांनी फोडणे किंवा बोटांनी दाबू नयेत.
- मधुमेह असल्यास नाकात माळीण झाल्यास विशेष काळजी घ्यावी व आपल्या डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत.
हे सुद्धा वाचा :
माळीणप्रमाणे नाकातून रक्त येण्याचा त्रासही अनेकांना असतो. नाकातून रक्त येणे यावरील उपाय जाणून घ्या.
Read Marathi language article about Boils inside nose home remedies. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.