सर्दी होणे –
बऱ्याचदा सर्दी होत असते. थंडी आणि पावसाच्या दिवसात सर्दी हमखास होत असते. व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी होते. सर्दी झाल्याने वाहणाऱ्या नाकामुळे जीव अगदी हैराण होत असतो.
<
सर्दीवर करायचे घरगुती उपाय –
गरम दूध आणि हळद –
सर्दी झाल्यास एक कप गरम दूधात एक चमचा हळद घालून ते दूध प्यावे. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल त्यामुळे सर्दी लवकर जाण्यासाठी मदत होते.
आले –
सर्दीवर आले खूप उपयोगी पडते. यासाठी सर्दी झाल्यावर आल्याचा बारीक तुकडा चावून खावा. या उपायाने सर्दीमुळे घशाला आलेली सूज आणि खोकलाही कमी होतो.
तुळशीच्या पानांचा काढा –
एक कप पाण्यात तुळशीची पाच-सहा पाने घालून त्यात आल्याचा तुकडा बारीक करून टाकावा व मिश्रण चांगले उकळावे. हा आले आणि तुळशीचा काढा थोडा कोमट झाल्यावर प्यावा. हा उपाय सर्दीवर खूप उपयोगी ठरतो.
लिंबू रस आणि मध –
लिंबूरसात व्हिटॅमिन-C मुबलक असल्याने सर्दी दूर होण्यासाठी ते खूप उपयुक्त ठरते. यासाठी लिंबू रसात दोन चमचे मध घालून ते कोमट पाण्यातून प्यावे.
काळी मिरी, सुंठ आणि मध –
सर्दीमध्ये काळी मिरी पावडर आणि सुंठीचं मिश्रण मधातून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे.
सर्दी झाल्यावर घ्यायची काळजी :
- सर्दी झाल्यावर दिवसभरात पुरेसे पाणी व तरल पदार्थ वरचेवर पित राहावे.
- सर्दी झाल्यावर विश्रांती घ्यावी.
- थंड पदार्थ व थंड वातावरणापासून दूर राहावे.
- एसी व फॅनचा वापर करणे टाळावे.
- उबदार कपडे वापरावेत.
- झोपताना उबदार पांघरूण घ्यावे.
- शिंकताना नाकापुढे रुमाल धरावा. म्हणजे इतरांना सर्दीची लागण होणार नाही.
हे सुद्धा वाचा –
घसा दुखणे यावरील उपाय जाणून घ्या.
Read Marathi language article about Common cold Home remedies. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.