पाच महिन्याच्या बाळाचा आहार, वजन आणि झोप अशी असावी – 5 month baby care tips in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

पाच महिन्यांचे बाळ :

बाळाच्या जन्मापासूनच ते बाळ थोडे मोठे होईपर्यंत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याठिकाणी पाच महिन्याच्या बाळाची घ्यावयाची काळजी याची सविस्तर माहिती दिली आहे.

पाच महिन्याच्या बाळाचे वजन आणि उंची :

प्रत्येक बाळाचा शारीरिक विकास वेगवेगळा असतो.
बालकाचे (baby boy) चे वजन 6.1 ते 9.2 किलो आणि उंची 68 सेमी पर्यंत इतकी असू शकते. 
तर बालिकेचे (baby girl) चे वजन साधारण वजन 5.5 ते 8.7 किलो असते आणि उंची सुमारे 65 सेमी पर्यंत असू शकते.

पाच महिन्यांच्या बाळातील विकासाचे टप्पे :

• बाळाची मान धरते. मानेचा तोल सावरता येतो.  
• डोके वर उचलू शकते.
• हातावर ताबा येतो.
• दुसऱ्या बाजूवर पालथे होण्याचा प्रयत्न करीत असतात.
• खेळणी अधिक आवडू लागतात.
• यावेळी वजन हे जन्म वजनाच्या दुप्पट होते.

पाच महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता असा असावा :

पहिले सहा महिने नवजात बालकाचा आहार म्हणजे आईचे दूध हेचं असते. त्यामुळे पाचव्या महिन्यातही बाळाला स्तनपान करावे. पाच महिन्याची बालके दिवसभरात सहा ते सात वेळा स्तनपान करू शकतात. आईचे दुध सोडून बाळास इतर कोणताही आहार 5व्या महिन्यात देऊ नये. त्यामुळे बाळास पाणी, ग्राईप वॉटर, ग्लुकोजचे पाणी, फळांचा रस, गुटी वैगरे काहीही देऊ नये.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

काही परिस्थितीत बाळास आईचे दूध देता येत नसल्यास पावडरचे फॉर्म्युला दूध दिले जाते. पाचव्या महिन्यात फॉर्म्युला दूध देताना बाळाला पाच ते सहा वेळा फॉर्म्युला दूध दिले पाहिजे.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

पाच महिन्याच्या बाळाची झोप :

पाच महिन्याचे बाळ 12 ते 15 तास झोप घेत असते. बाळाची वाढ आणि विकासासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक असते.

पाचव्या महिन्यात बाळाच्या विकासासाठी हे करा :

पाचव्या महिन्यातही बाळाला काही वेळ पोटावर झोपवावे व त्याच्या समोर खेळणी ठेवावी. त्यामुळे बाळ आपले डोके व खांदे वर उचलतात. त्यामुळे त्याची मान, पाठ खांदा येथील मांसपेशी मजबूत होतात व बाळाची मान धरते तसेच बाळ पालथे होण्यास शिकते. याशिवाय,
• अंघोळ घालण्यापूर्वी बाळाला मालिश करावी.
• बाळाला रंगीबेरंगी खेळणी आणून द्यावीत.
• बाळाबरोबर खेळण्यांनी खेळावे.
• बाळाला झोपवताना छान छान अंगाई गीते म्हणावीत.

डॉक्टरांकडे कधी जावे..?

पाचव्या महिन्यात बाळ दूध पीत नसल्यास किंवा त्याला ताप, अतिसार, उलट्या, सर्दी, खोकला असे त्रास झाल्यास बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जावे.

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


वरील माहिती आपणास आवडल्यास आमचे Youtube चॅनेल subscribe जरूर करा. असेच उपयुक्त माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपणास मोफत उपलब्ध होतील. यासाठी खालील YouTube बटनावर क्लिक करा..