पांढऱ्या केसांची समस्या अनेकांना असते. अनुवंशिकता, ताणतणाव, चुकीचा आहार आणि प्रदूषण अशी कारणे पांढऱ्या केसांच्या समस्येला जबाबदार असतात. काही लोक पांढर्या केसांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी केमिकल असलेली उत्पादने वापरतात पण यामुळे समस्या अधिकच वाढण्याची शक्यता असते. यासाठी येथे पांढऱ्या झालेल्या केसांसाठी कोणते घरगुती उपाय करावे यांची माहिती खाली सांगितली आहे.
पांढऱ्या केसांवर हे करा घरगुती उपाय :
आवळा –
आवळा पावडरमध्ये लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट पांढऱ्या केसांना लावावी. पांढऱ्या केसांसाठी हा आयुर्वेदिक उपाय खूप उपयोगी पडतो.
कोरफड –
कोरफडीचा गर काढून त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून ते मिश्रण केसांना लावावे. काही वेळानंतर केस धुवून टाकावेत. पांढऱ्या केसांसाठी हा घरगुती उपायही उपयुक्त असतो. यामुळे आपले केस काळे होण्यास मदत होईल.
कडीपत्ता –
कडीपत्ता खोबऱ्याच्या तेलात घालून ते उकळावे. तयार केलेले तेल रोज रात्री आपल्या केसांना लावून मसाज करावा. या घरगुती उपायामुळे पांढऱ्या केसांपासून सुटका होण्यास मदत होते.
भृंगराज –
भृंगराज किंवा माक्यापासून बनवलेले तेल केसांना लावून मसाज करावा. यामुळेही पांढऱ्या केसांची समस्या दूर होण्यास मदत होते.
चहापावडर –
चहा, कॉफी किंवा ब्लॅक टीच्या चोथा पांढऱ्या केसांना चोळावा आणि थोड्या वेळाने केस धुवावेत.
कांदा –
कांद्याची बारीक पेस्ट करुन त्यात लिंबाचा रस घालावा. ही तयार केलेली पेस्ट केसांना लावावी. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवावेत. हा घरगुती नैसर्गिक उपयही पांढऱ्या केसांसाठी उपयोगी असतो.
अशाप्रकारे पांढर्या केसांपासून मुक्त होण्यासाठी या घरगुती उपायांचा उपयोग होतो.