गजकर्ण नायटा – Ringworm :
गजकर्ण हा विशिष्ट बुरशीमुळे होणारा त्वचारोग आहे. गजकर्णला नायटा किंवा खरूज या नावानेही ओळखले जाते. गजकर्ण, नायट्याचे मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता हे आहे. पावसाळ्यातील ओलसर दमट हवामान ह्या रोगासाठी पोषक असते. नियमित अंघोळ न केल्याने, स्वच्छतेअभावी त्वचेवर गजकर्ण, नायट्याच्या बुरशीची वाढ होते.
ट्रायकोफायटॉन रूब्रम, मायक्रोस्पोरम कॅनिस आणि एपिडर्मोफायटॉन फ्लॉकोसम या तीन जातींच्या बुरशीमुळे गजकर्ण होतो. प्रामुख्याने डोक्याची त्वचा, हाताचे तळवे, मनगटे, काखा, जांघा, मांड्या, हातापायांच्या बोटांमधील जागा इ. शरीराच्या वेगवेगळ्या भागांत हा रोग होऊ शकतो.
गजकर्ण व नायटाची लक्षणे (Ringworm Symptoms) :
या रोगात त्वचेवर वर्तुळाकार किंवा अंगठीप्रमाणे लालसर चट्टे उठतात. लाल चट्टे मुख्यतः जांघेत, ओटीपोटावर, काखेत, स्तन ग्रंथीवर दिसतात. हळूहळू त्यावर पांढरे कोंड्यासारखे पापुद्रे तयार होतात. त्या भागाला खूप खाज सुटते. शरीराच्या भागानुसार गजकर्णाचे प्रकार ओळखले जातात. उदा. डोक्याच्या गजकर्णाला खवड्या, तर पायाच्या बोटांमधील गजकर्णाला चिखल्या म्हणतात.
हाच आजार जर हातावर झाला तर त्याला टीनिया मानम म्हणतात आणि पायावर झाला तर टीनिया पेडीस/अॅथलिट्स फुट असं म्हणतात.
गजकर्ण होण्याची कारणे व रोगप्रसार (Gajakarna Causes) :
• गजकर्ण हा विशिष्ट बुरशीमुळे होणारा त्वचारोग आहे. गजकर्ण, नायट्याचे मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता हे आहे.
• गजकर्णाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीचे कपडे, कंगवा व ब्रश वापरल्यास हा रोग होऊ शकतो.
• स्नानगृह, स्विमिंगपूल, केशकर्तनालय इ. सार्वजनिक माध्यमांतून त्याचा प्रसार होण्याची शक्यता असते.
• प्राण्यांमध्येही गजकर्ण हा रोग आढळतो. ह्या रोगाचा प्रसार अस्वच्छ कुत्रे व मांजरी यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क झाल्यानेही होतो.
संसर्ग झालेल्या बुरशीच्या प्रकारानुसार गजकर्णावर उपचार केले जातात. कोणत्या प्रकारची बुरशी आहे हे लॅबमध्ये सूक्ष्मदर्शकाने ठरवितात. यासाठी गजकर्ण झालेल्या त्वचेचा लहान तुकडा सूक्ष्मदर्शकाखाली पाहतात. आवश्यकता भासल्यास बुरशी संवर्धन करतात आणि त्याचा प्रकार ठरवितात.
गजकर्ण नायटावरील उपाय :
• गजकर्ण किंवा नायटा होऊ नये यासाठी नियमित अंघोळ करावी. वयक्तिक स्वच्छता पाळावी.
• संसर्ग आणि लक्षणे यांची तीव्रता जास्त असेल, तर प्रतिजैविक औषधे (अँटी-बायोटिक) पोटात घ्यावी लागतात.
गजकर्ण नायटा उपचार माहिती (Ringworm treatments) :
गजकर्णवर वेळीच योग्य न केल्यास हा त्रास पुढे पसरतच जातो. यासाठी गजकर्णच्या त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते. सॅलिसिलिक ऍसिड, बेंझॉइक ऍसिड, रिसॉर्सिन, अॅमिडॅझॉल, टेरबिनाफाईन ही मलमे गजकर्णावर उपयोगी पडू शकतात.
Read Marathi language article about Ringworm symptoms, causes & treatments. Last Medically Reviewed on February 19, 2024 By Dr. Satish Upalkar.