प्रसुतीची संभाव्य तारीख :
प्रेग्नन्सीचा कालावधी 40 आठवडे इतका असतो. प्रसूतीची संभाव्य तारीख ही शेवटच्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून नऊ महिने आणि एक आठवडा अशी मोजली जाते.
म्हणजे जर एखाद्या स्त्रीची मासिक पाळीची शेवटची तारीख ही 5 जानेवारी असल्यास तेथून पुढे 9 महिने + 7 दिवस म्हणजे 12 सप्टेंबर ही प्रसूतीची संभाव्य तारीख असते.
दिलेल्या तारखेलाच डिलिव्हरी होते का..?
आपल्या डॉक्टरांनी प्रसूतीची संभाव्य तारीख दिली असली तरीही त्याच तारखेलाचं डिलिव्हरी होईल असे नसते. कारण फक्त 4 टक्केच स्त्रियांमध्ये दिलेल्या तारखेला प्रसुती होत असल्याचे आढळते. तर बहुतांश स्त्रियांमध्ये एक आठवडा पुढे किंवा मागे प्रसूती होत असते. म्हणजे साधारणपणे 37 ते 42 आठवड्यामध्ये प्रसुती होत असते. तसेच 4 टक्के स्त्रियांना 42 आठवडे होऊनही प्रसुतीच्या कळा येत नाहीत. त्यामुळे दिलेल्या तारखेलाचं प्रसूती होईल हे निश्चित असे सांगता येत नाही.
मग बाळंतपणाची निर्धारित तारीख कशासाठी दिली जाते..?
ढोबळमानाने प्रसुती कधी होईल ते लक्षात राहावे तसेच या तारखेच्या आधी किंवा नंतर प्रसुतीच्या कळा येत आहेत का ते समजण्यास यामध्ये मदत होते. तसेच बाळंतपणाची तारीख माहिती असल्यास बाळंतपणाची तयारी, प्रवास व देखरेख यांची व्यवस्था करता येते.
Read Marathi language article about Pregnancy Due Date. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.