बाळंतपणातील शेक शेगडी (Postpartum massage ) :
बाळंतपणानंतर मसाज, शेक व धुरी देण्याचे विशेष महत्त्व आयुर्वेदाने सांगितले आहे. मात्र आजकाल कामाच्या व्यापातून याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी बाळंतपणानंतर अनेक स्त्रियांना पुढे सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, हातापायाला मुंग्या येणे, आमवात असे विविध त्रास होऊ शकतात. यासाठी डिलिव्हरीनंतर सव्वा महिना मसाज, शेक शेगडी यांचा अवलंब करण्याचा सल्ला आयुर्वेदिक तज्ञ देत असतात.
आजच्या काळानुसार बाळंतपणानंतर मसाज, शेक शेगडी असे करा :
आयुर्वेदिक वेदनाहर तेल किंवा मोहरीचे किंवा तिळाचे तेल थोडे कोमट करून घ्यावे. त्या तेलाने बाळंतीणीच्या हात, पाय आणि कंबरेला चांगली मालीश करावी. पायाच्या गुडघ्यांना, घोट्याला तेल चोळून चांगले जिरवावे. त्यानंतर दोन तीन बादल्या गरम पाण्याने बाळंतीणीने आंघोळ करावी. मालिश आणि गरम पाण्याने शेकल्यामुळे प्रसुतीमुळे झालेली अंगदुखी, पाठदुखी कमी होऊन आरामदायी वाटू लागते. याशिवाय शक्य असल्यास आंघोळीनंतर बाळांतशेपाची धुरी घेणेहो उपयुक्त असते.
काळजी केंव्हा घ्यावी..?
सिझेरियन डिलिव्हरी झालेली असल्यास पोटाला तेल लावून मालिश करू नये. कारण पोटावर असणाऱ्या टाक्यांना दुखापत व इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. अशी काळजी घेतल्यास बाळंतपणात शेक आणि मसाज यांचा निश्चितच चांगला उपयोग होईल.
Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.