प्रसूतीनंतर मासिक पाळी कधी सुरू होते..?
बाळास स्तनपान सुरू आहे की नाही यानुसार बाळंतपणानंतर मासिक पाळी कधी सुरू होणार ते ठरत असते. साधारणपणे डिलिव्हरीनंतर तीन ते सहा महिन्यांनी पाळी येऊ शकते. तसेच काही स्त्रियांना एक किंवा दोन वर्षं पाळीच येत नाही.
जर आपण बाळास स्तनपान करीत असल्यास..
जोपर्यंत आपण बाळाला स्तनपान करीत आहात तोपर्यंत मासिक पाळी सुरू होत नाही. बाळ जेंव्हा आईचे दूध पिणे थांबवते तेंव्हा हळूहळू मासिक पाळी येण्याची प्रक्रिया सुरू होत असते.
जर आपण बाळास स्तनपान करीत नसल्यास..
बाळंतपणात जर आपण बाळाला स्तनपान करत नसल्यास सहा आठवड्यांनंतर मासिक पाळी पुन्हा सुरू होऊ शकते. किंवा यापेक्षाही थोडा अधिकवेळ लागू शकतो.
हे लक्षात ठेवा..
डिलिव्हरी झाल्यावर सुमारे चार आठवड्यांनंतर संबंध घडल्यास आपण पुन्हा प्रेग्नंट होऊ शकता. आपण नुकतेच गरोदर, प्रसुती या अवस्थेतून गेला आहात. स्तनपान व बाळाची काळजी घेणे चालू आहे. अशावेळी आपण पुन्हा आत्ता लगेच प्रेग्नंट होऊ इच्छिता का, याचा विचार करणेही आवश्यक आहे. त्यामुळे जर आपण लगेच गरोदर होऊ इच्छित नसाल, तर प्रसुतीनंतर संबंध ठेवताना गर्भनिरोधक उपायांचा वापर करा.
Read Marathi language article about periods after delivery. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.