जन्मापासून काही महिने आईचे दूध हाच बाळाचा योग्य आहार असतो. आईच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व ती पोषकद्रव्ये असतात. त्यामुळेच नवजात बाळाला पहिल्या सहा महिन्यापर्यंत केवळ आईचे दूधच दिले पाहिजे.
बाळाला किती दिवस आईचे दूध पाजावे..?
पाहिले सहा महिने बाळाला केवळ आईचे दूध किंवा फॉर्म्युला दूध देणे गरजेचे असते. सहा महिने झाल्यावर आईच्या दुधाबरोबरचं काही पूरक आहारही द्यावा लागतो.
सहा महिन्यानंतर जसजसे बाळ वाढत असते, तसतसे त्यास अधिक पोषण मिळण्याची आवश्यकता असते. अशावेळी, केवळ आईचे दूध किंवा वरचे दूध हे त्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुरेसे पडत नाही. त्यामुळे सहा महिने झाल्यावर बाळास हळूहळू आईच्या दुधाबरोबर इतर ठोस आहार देणे गरजेचे असते.
मात्र अशावेळीही बाळ किमान एक ते दीड वर्षांचे होईपर्यंत ठोस आहाराबरोबर आईचे दूध किंवा फॉर्म्युला दूध देणे अधिक चांगले असते.
Read Marathi language article about How Long Should You Breastfeed? Last Medically Reviewed on February 16, 2024 By Dr. Satish Upalkar.