बाळंतपण सहज होण्याचे उपाय :

डिलिव्हरीची वेळ जवळ येईल तशी स्त्रीला मानसिक आणि शारीरिक आधाराची गरज असते. प्रसूतीच्या वेदनांचा ताण त्या स्त्रीवर येत असतो. अशावेळी आपले डॉक्टर, नर्स तसेच आपले कुटुंबीय आपणास या परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी आधार देतील.

बाळंतपणाचा अनुभव थोडा वेदनादायक असू शकतो. याठिकाणी प्रसूतीच्यावेळी होणाऱ्या वेदना काही प्रमाणात कमी करण्याचे व बाळंतपण सुलभरित्या होण्यासाठी काही उपाय खाली दिले आहेत.

सुलभ नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी काही सोपे उपाय :

प्रसूतीवेळी जोडीदार सोबत असावा..
डिलिव्हरीदरम्यान आपला पती किंवा आई त्याठिकाणी आपल्याजवळ उपस्थित असल्यास ते आपले मनोधैर्य वाढवू शकतात. त्यामुळे आपला ताण हलका होईल आणि प्रसूती वेदनांना आपण सहजरीत्या सामोरे जाऊ शकाल.

डिलिव्हरीची योग्य स्थिती निवडा..
प्रसूती केवळ ही बेडवर झोपलेल्या अवस्थेतचं फक्त होत नसते. तर यासाठी अनेक स्थिती उपलब्ध आहेत. प्रसूतीदरम्यान आपण कोणत्या स्थितीत आहात त्याचा प्रसूतीच्या वेदना आणि प्रसूती कालावधीवर बराच परिणाम होत असतो. विशेषतः प्रसूतीवेळी उभे राहिलेल्या स्थितीत असल्यास गुरुत्वाकर्षणामुळे बाळ खाली सरकून सुलभरीत्या प्रसूती होऊ शकते. तर बेडवर झोपलेल्या स्थितीत असल्यास रक्तप्रवाह सीमित होतो त्यामुळे प्रसूती थोडी कठीण बनते. तसेच या स्थितीत पाठीवर झोपून राहिल्याने आपल्या पाठीचा त्रासही यावेळी होऊ शकतो. त्यामुळे आपणास जी स्थिती योग्य वाटेल ती निवडा.

आकुंचन दरम्यान थोडे चालावे..
संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की प्रसूतीच्या वेदनाच्या दरम्यान चालल्यास प्रसूती लवकर होण्यास मदत होते. यासाठी आपल्या पती किंवा आईला धरून थोडावेळ चालावे.

प्रसूती दरम्यान मालिश..
मालिश केल्याने आपल्याला प्रसूतीदरम्यान आराम मिळतो, कारण यामुळे आपल्या शरीरात चांगले संप्रेरक तयार होतात. हे हार्मोन्स आपल्याला आराम करण्यास मदत करतात.

योग्यप्रकारे श्वास घ्या..
प्रसूतीदरम्यान योग्यप्रकारे श्वास घेतल्यास शरिराला मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे प्रसूतीवेदना कमी होऊन बाळ प्रसुतीच्या वेळी सहज बाहेर येते. यासाठी आपले डोळे बंद करून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करावे आणि दीर्घ श्वास घ्या.

Tips for Easy Labour and Normal Delivery in Marathi.


प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...