अनेकदा आपला कान दुखत असतो. अनेक कारणांनी कान दुखतो. यामध्ये कानात इन्फेक्शन होणे, कानात मळ अधिक होणे ही कारणे प्रमुख असतात.
कान दुखण्याची कारणे :
याची कारणे पुढील्रमाणे असू शकतात,
- कानात बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळे,
- सर्दी झाल्याने,
- सायनस इंन्फेकशनमुळे,
- कानात मळ अधिक झाल्याने,
- कानाचा पडदा फाटल्यामुळे,
- कानात काडी अथवा टोकदार वस्तू घालून जखम झाल्यामुळे कान दुखतो.
कान दुखत असल्यास करायचे उपाय :
लसूण –
दोन ते तीन लसूण पाकळ्या बारीक करून मोहरीच्या तेलात गरम कराव्यात. थंड झाल्यावर तेल गाळून घ्यावे. ह्या तेलाचे 2-3 ड्रॉप्स दुखणाऱ्या कानात घालावे.
कांदा –
कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. यासाठी कांदा थोडा गरम करून त्याचा चमचाभर रस काढावा. या रसाचे 2 ते 3 ड्रॉप्स कानात दिवसातून 3 वेळा घालावेत.
आले –
आल्याच्या रसाचे 2 ते 3 ड्रॉप्स कानात दिवसातून 3 वेळा घालावे. कारण आल्यामध्ये वेदना कमी करणारे आयुर्वेदिक गुणधर्म असतात.
औषध उपचार :
नेमका कशामुळे कान दुखत आहे त्यानुसार त्यावरील औषध उपचार ठरतात. आपले डॉक्टर हे वेदना कमी करण्यासाठी paracetamol, ibuprofen सारखी वेदनाशामक गोळ्या औषधे देतील. याशिवाय इन्फेक्शन झाल्यामुळे कान दुखत असल्यास antibiotics औषध किंवा eardrops देतील. आणि जर कानात मळ अधिक झाल्याने कान दुखत असल्यास त्यासाठी मळ बाहेर निघण्यासाठी Clearwax सारखा eardrops दिला जाईल. कान दुखतो त्याच्यावर अशाप्रकारे आपले डॉक्टर उपचार करतील.
हे सुध्दा वाचा..
कानातील मळ काढण्याचे उपाय
Read Marathi language article about Earache . Last Medically Reviewed on February 28, 2024 By Dr. Satish Upalkar.