बाळाला बाटलीने दूध कसे पाजावे..?
बाळाला बाटलीने दूध पाजणे शक्यतो टाळले पाहिजे. कारण दुधाच्या बाटलीची योग्य ती स्वच्छता ठेवणे आवश्यक असते. योग्य स्वच्छता न घेतल्यास बाळाला इन्फेक्शन होण्याचा धोकाही वाढतो. तरीही बाळाला बाटलीने दूध पाजवायचे असल्यास खालील काळजी घ्यावी.
बाटलीने बाळाला दूध पाजण्याची पद्धत :
• बाळाची दुधाची बाटली ही वापरापूर्वी स्वच्छ करून घ्यावी.
• बाटलीचे बूथ व्यवस्थित गरम पाण्याने स्वच्छ धुवावे.
• बाटलीतील दूध हे जास्त गरम नसावे.
• उकळवून कोमट केलेले दूध बाटलीत ओतावे.
• बाळाला मांडीवर घेऊनच बाटलीने दूध पाजावे.
• बाळाच्या हातात दुधाची बाटली देऊन आपण दुसऱ्या कामाला जाऊ नये.
• बाटलीच्या बुचाचे छिद्र योग्यप्रकारे असावे. म्हणजे बाटली उलटी केल्यास थेंबथेंब दूध पडले पाहिजे.
अशी काळजी बाळाला बाटलीने दूध पाजताना घेणे आवश्यक असते.
Read Marathi language article about how to make bottle milk for baby? Last Medically Reviewed on February 16, 2024 By Dr. Satish Upalkar.