बाळ कधी चालते..?
चालण्यास शिकणे बाळाच्या एकूणच विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. पहिल्या वर्षापर्यंत बाळ पालथी होण्यास, आधाराशिवाय बसण्यास आणि रांगण्यास शिकलेले असते. त्यानंतर बाळ हळूहळू आधारासह उभे राहण्याचा प्रयत्न करत असते. थोड्या दिवसात ते आधाराने चालण्याचाही प्रयत्न करीत असते. त्यानंतर पुढे कोणत्याही आधाराशिवाय हळूहळू पावले पुढे टाकण्यासही ते शिकलेले असते.
बाळ किती महिन्यात चालते..?
साधारणपणे 12 ते 16 महिने यादरम्यान अधिकांश बालके चालण्यास शिकतात. तर काही बालके 17 ते 18 व्या महिन्यातही चालायला शिकू शकतात.
बाळाला चालायला कसे शिकवावे..?
बाळ 9 ते 10 व्या महिन्यात आधाराला धरून उभे राहायला शिकते. 11 ते 12 व्या महिन्यात कोणत्याही आधाराशिवाय उभे राहते. त्यावेळी त्याच्या हाताला धरून आपण आधार देऊन त्याला हळूहळू चालायला शिकवू शकता. यामुळे चालण्यासाठीच्या मांसपेशी मजबूत होऊन बाळ लवकर चालण्यास शिकते.
हे सुद्धा वाचा –बाळाच्या वाढीचे व विकासाचे टप्पे जाणून घ्या..
Read Marathi language article about When do babies start walking? Last Medically Reviewed on March 11, 2024 By Dr. Satish Upalkar.