नवजात बाळ लघवी अशी करते :
जन्मानंतर 48 तासांत बाळाची पहिली लघवी कधीही होऊ शकते. पहिल्या 48 तासांत लघवी न झाल्यास बाळाच्या तपासण्या कराव्या लागतात. पहिल्या सात दिवसांत बाळाला शू होण्याचे प्रमाण कमी असते. लघवी करण्यापूर्वी रडणे ही नॉर्मल बाब आहे. लहान बाळाला पाण्यासारखी किंवा फिकट पिवळ्या रंगाची लघवी होत असते.
पाहिले 3 ते 7 दिवस –
जन्मानंतरच्या पहिल्या 3 ते 5 दिवसात बाळाला तीन ते चार वेळा लघवीला होऊ शकते.
सात दिवसानंतर –
जन्मानंतरच्या 7 दिवसानंतर बाळाला दिवसभरात सहा ते आठ वेळा लघवीला होऊ शकते.
एक आठवड्यानंतर पूर्णपणे स्तनपानावर अवलंबून असलेले लहान बाळ 24 तासांत कमीत कमी सहा ते आठ वेळा लघवी करीत असेल तर त्यास पुरेसे दूध मिळते आहे असे समजावे.
बाळास शू होत नसल्यास डॉक्टरांकडे कधी जावे..?
• लहान बाळाला कमी लघवी होत असल्यास, लघवी दाट आणि गडद पिवळ्या रंगाची होत असल्यास डॉक्टरांकडे जावे.
• एक आठवड्यानंतरच्या बाळांना दिवसभरात 5 पेक्षा कमी वेळा लघवीला होत असल्यास,
• बाळ पुरेसे स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध पीत नसल्यास,
• बाळाचे तोंड, ओठ कोरडे वाटत असल्यास डॉक्टरांकडे जावे. कारण डिहायड्रेशनमुळे असे होऊ शकते.
• लघवीतून दुर्गंधी येत असल्यास, लघवीतून रक्त येत असल्यास डॉक्टरांकडे जावे.
Last Medically Reviewed on February 16, 2024 By Dr. Satish Upalkar.