नवजात बाळाला सहा महिने पूर्ण होईपर्यंत फक्त आईचेच दूध देणे आवश्यक असते. सहा महिने पूर्ण झाल्यावर हळूहळू पूरक आहार सुरु करणे अपेक्षित असते. बाळाचा पूरक आहार सुरू केल्यावर त्याला पाणी पिण्यास देऊ शकता.
सहा महिन्यापर्यंत बाळाला पाणी का पाजावे लागत नाही..?
बाळास स्तनपान सुरू असताना पाणी पाजण्याची आवश्यक नसते. कारण आईच्या दुधात पुरेसे पाणी असते. अशाप्रकारे बाळाची सहा महिन्यांपर्यंतची पाण्याची गरज आईच्या दुधातून पूर्ण होते. त्यामुळे बाळास सहा महिन्यापर्यंत पाणी तसेच फळांचा रस, वरचे दूध किंवा ग्राईप वॉटर असे काहीही देण्याची गरज नसते.
लहान बाळाला कधीपासून पाणी पिण्यास द्यावे..?
बाळ सहा महिन्यांचे झाल्यावर हळूहळू पूरक आहार सुरू केला जातो. त्यावेळी बाळाच्या आहारात पातळ पदार्थ, वरण डाळ, भाजीचे सूप, फळांचा गर, ताज्या फळांचा रस दिला जातो. अशावेळी बाळास पाणी पिण्यास देऊ शकता. म्हणजे बाळ सहा महिन्यांचे झाल्यावर त्याला पाणी पिण्यास देऊ शकता. बाळाला शक्यतो उकळवून गार केलेले किंवा फिल्टरचे पाणी पिण्यास दिले पाहिजे.
Read Marathi language article about When Can Baby Start Drinking Water? Last Medically Reviewed on February 16, 2024 By Dr. Satish Upalkar.