बाळ उभे राहणे :
उभे राहण्यास शिकल्यामुळे बालकांना चालण्यास जमत असते. सुरवातीला उभे राहण्यासाठी बाळ खुर्ची, फर्निचर यांचा आधार घेऊन उभे राहण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर थोड्या दिवसांनी कोणत्याही आधाराविनाही ते उभे राहत असते.
बाळ आधार घेऊन कधीपर्यंत उभे राहते..?
साधारणपणे नवव्या ते दहाव्या महिन्यात बाळ हे आधाराला धरून उभे राहण्याचा प्रयत्न करते. बाळ आधाराने उभे राहिल्यास ते आई-वडिलांचे बोट धरून किंवा भिंतीच्या आधाराने हळूहळू चालण्याचा प्रयत्नही करू शकतात.
बाळ आधाराशिवाय उभे राहण्यास कधी शिकते..?
फर्निचर, खुर्ची यांचा आधार घेऊन उभे राहणारे बाळ हळूहळू कोणत्याही आधाराशिवाय उभे राहण्यास शिकलेले असते. साधारण 11 ते 12 व्या महिन्यात बाळ कोणत्याही आधाराशिवाय उभे राहत असते.
उभे राहण्यास शिकल्यानंतर बाळ पुढे काय शिकते..?
बाळ आत्मविश्वासपूर्वक उभे राहण्यास शिकल्यानंतर पुढे हळूहळू चालण्यास शिकत असते. बाळ चालण्यास कधी शिकते ते जाणून घ्या..
Read Marathi language article about When Do Babies Stand? Last Medically Reviewed on March 11, 2024 By Dr. Satish Upalkar.