डोळ्याखालील डार्क सर्कल्स :
अनेकजणांना डोळ्यांखाली डार्क सर्कल्स होण्याची समस्या असते. अपुरी झोप, ताणतणाव, अशक्तपणा, हार्मोन्समधील बदल, वाढते वय, डिहायड्रेशन, उन्हात अधिक फिरणे अशी अनेक कारणे याला कारणीभूत असतात. डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल्स (Eye dark circles) असल्यास त्याचा परिणाम चेहऱ्याच्या सौंदर्यावरही होत असतो. यासाठी येथे डोळ्याखालील डार्क सर्कल दूर करण्यासाठी घरगुती उपाय दिले आहेत.
डोळ्याखालील डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी हे करा उपाय :
बटाटा –
डोळ्याखालील डार्क सर्कल्स असल्यास बटाटाच्या चकत्या डोळ्यांवर ठेव्याव्यात आणि दहा मिनिटांनी डोळे व चेहरा गार पाण्याने धुवावा.
काकडी –
डोळ्याखालील डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी काकडीही उपयुक्त ठरते. यासाठी थंड काकडीचे दोन काप घेऊन ते 25-30 मिनिटे डोळ्यावर ठेवावेत.
टोमॅटो आणि लिंबाचा रस –
लिंबाचा रस आणि टोमॅटोचा रस एकत्र करावा आणि या मिश्रणानं डोळ्याखालील डार्क सर्कल्सवर मसाज करावा. वीस मिनिटानंतर पाण्याने डोळे व चेहरा धुवावा. यामुळेही डोळ्याखाली असणारी डार्क सर्कल्स दूर होण्यासाठी मदत होते.
मसाज –
खोबऱ्याचे आणि बदामाच तेल एकत्र करून त्यानं डार्क सर्कल्सवर हलक्या हाताने मसाज करावा. एक तास हे तेल चेहऱ्यावर राहू द्यावं. तासाभरानं कोमट पाण्यानं चेहरा व डोळे धुवावेत.
हर्बल टी-बॅग –
हर्बल चहा बनवल्यानंतर त्या टी बॅग्ज किंवा वापरलेला चहा पावडरचा चोथा टाकून न देता ते फ्रीजमध्ये ठेवावा. त्यानंतर त्या थंड टी बॅग्ज किंवा हर्बल चहा पावडर कापडात बांधून डोळ्यांवर ठेवावी. याचाही खूप चांगला परिणाम होतो आणि डार्क सर्कल्स कमी होण्यासाठी मदत होते.
Read Marathi language article about under eyes dark circles home remedies. Last Medically Reviewed on February 27, 2024 By Dr. Satish Upalkar.