बाळाची ढेकर (Baby burping) :
काहीवेळा दूध पिल्यानंतर बाळाला उलटी होत असते अशावेळी बाळाने दूध पिल्यावर त्याची ढेकर काढली पाहिजे. कारण दूध पित असताना बाळाच्या पोटात हवा जात असते. त्यामुळे बाळाला पोटफुगी व गॅसेस समस्येचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः बाटलीने दूध पिणाऱ्या बाळांना अशी समस्या अधिक होत असते. अशावेळी बाळाची ढेकर काढल्यास, त्याला होणारा त्रास टाळता येतो.
केंव्हा काढावी बाळाची ढेकर..?
दूध पिऊन झाल्यावर आपण बाळाची ढेकर काढू शकता. मात्र जर स्तनपान केल्यानंतर लगेच बाळ झोपी गेल्यास ढेकर काढण्याची गरज नसते. स्तनपान करताना एका बाजूच्या स्तनाद्वारे दूध दिल्यानंतर दुसऱ्या बाजूच्या स्तनाद्वारे बाळास दूध पाजण्यापूर्वी बाळाची ढेकर काढू शकता.
बाळाचा ढेकर कसा काढावा याची पद्धत –
बाळास दूध पाजल्यावर बाळाला उभे करून आपल्या खांद्याजवळ त्याला घ्यावे व बाळाची पाठ हळूहळू आपल्या हाताने थोपटावी. अशावेळी बाळाची पाठ थपथपावत असताना हळू आवाजात गाणे गुणगुणावे त्यामुळे बाळास ढेकर येऊन जाईल व बाळास झोपही येण्यास मदत होईल.
Read Marathi language article about baby burping techniques. Last Medically Reviewed on March 11, 2024 By Dr. Satish Upalkar.