घशात टोचणे :
अनेक कारणांमुळे घशात टोचल्या सारखे होत असते. सर्दी किंवा खोकला येण्यापूर्वी हा त्रास होऊ शकतो. तसेच घशातील इन्फेक्शन मुळेही घशात टोचल्या सारखे होते.
घशात टोचणे यावरील घरगुती उपाय :
मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
घशात टोचल्यासारखे होत असल्यास ग्लासभर गरम पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे घशाला आलेली सूज कमी होते व घशात टोचणे दूर होते.
आल्याचा तुकडा मधाबरोबर खावा.
घशात टोचत असल्यास आल्याचा तुकडा मधाबरोबर चावून खावा. यामुळे घशात टोचणे कमी होते. आले आणि मधामध्ये अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्यामुळे घशातील इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते. याशिवाय कपभर पाण्यात आले घालून ते पाणी उकळावे. त्यानंतर त्या पाण्यात मध मिसळून ते मिश्रण पिऊ शकता.
दुधात हळद घालून प्यावे.
घशात टोचल्या सारखे होत असल्यास गरम दुधात हळद घालून ते दूध प्यावे. यामुळे घशाला आलेली सूज कमी होऊन आराम मिळून घशात टोचणे कमी होते.
गरम द्रव्यपदार्थ प्यावेत.
घशात टोचत असल्यास काळी मिरी, आले, वेलदोडे, लवंग पाण्यात टाकून उकळावे. त्या उकळलेल्या पाण्यात चहापावडर घालून चहा करून गरम असतानाच प्यावा. यामुळेही घशात टोचणे कमी होते.
हे सुध्दा वाचा – घशात दुखणे यावरील उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Throat irritation causes and home remedies. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.