कडक संडास होणे –

चुकीचा आहार, बैठी जीवनशैली, व्यायाम न करणे अशा कारणांनी संडासला कडक होते. यावेळी संडासला खडा होऊन शौचास त्रास होत असतो.

कडक संडास होण्याची कारणे –

  • पचनास जड असणारे पदार्थ, फास्टफूड, बेकरी प्रोडक्ट, मांसाहार अधिक खाण्यामुळे कडक संडास होते.
  • पालेभाज्या, फळे कमी खात असल्यास संडासला कडक होते.
  • कमी पाणी पिण्याची सवय असल्यास त्यामुळेही संडास कडक होत असते.
  • बैठे काम व व्यायाम न करणे अशी कारणे सुध्दा यासाठी जबाबदार असतात.

कडक संडास होणे यावरील उपाय –

संडासला कडक होत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर गरम पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण घालून ते मिश्रण प्यावे. यामुळे सकाळी संडास साफ होण्यास मदत होते.

रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा एरंडेल तेल खाल्ल्यास संडास साफ होण्यासाठी मदत होते.

कडक संडास होत असल्यास रोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात लिंबूरस मिसळून त्यात चमचाभर एरंडेल तेल घालून प्यावे. हे उपाय कडक संडास होत असल्यास उपयोगी पडतात.

संडास कडक होऊ नये यासाठी घ्यायची काळजी –

  • पचायला जड असणारे पदार्थ खाणे टाळावे.
  • आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश करावा.
  • दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.
  • नियमित व्यायाम करावा.
  • बैठी कामे असलेल्या लोकांनी रोज कमीत कमी अर्धा तास व्यायाम करावा.

अशी काळजी घेतल्यास रोजच्या रोज संडासला साफ होण्यासाठी मदत होते. त्यामुळे संडासला कडक होत नाही.

हे सुध्दा वाचा – चिकट संडास होणे यावरील उपाय जाणून घ्या..

Read Marathi language article about Hard stool Causes and Home remedies. Last Medically Reviewed on February 27, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *