आरोग्याविषयी रंजक माहिती (Health facts in Marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Health facts in Marathi

सरासरीनुसार स्त्रीयां ह्या पुरूषांपेक्षा अधिक आयुर्मानाच्या असतात.

अंदाजे 10 लाईटेचे बल्ब प्रकाशमान होतील एवढी उर्जा आपला मेंदु वापरत असतो.

पूर्ण वाढ झालेल्या मेंदुचे वजन साधारणपणे 3 पाउंड (1300 ते 1400 ग्रॅम) असते.

130 डेसीबल पेक्षा अधिक आवाज हा शरीरासाठी घातक असतो.

जर केवळ 8 ते 10 सेकंदसुद्धा मेंदुतील रक्तपुरवटा खंडीत झाला तर मनुष्य बेशुद्ध पडतो.

ओठांजवळील त्वचा ही बोटांवरील त्वचेपेक्षा दोनशे पट अधिक संवेदनशील असते.

जर आपल्या यकृताने काम करणे थांबवले तर 24 तासात मृत्यु ओढावतो.

अधिक काळापर्यंत Tight pants घालण्याच्या सवयीमुळे पुरुषांमध्ये प्रजननसंबधी समस्या उत्पन्न होऊ शकतात.

आपले डोळे जन्मापासून ते मृत्युपर्यंत एकाच आकाराचे असतात. त्यांच्या आकारात वयाबरोबर वाढ होत नाही तर लहानपणीच्या नाक आणि कानाच्या आकारात मोठेपणी मात्र बराच फरक झालेला आढळतो.

दोन ग्लास मद्यपान केल्याने जेवढे नुकसान शरीराचे होते तेवढेच नुकसान 17 तास जागरण केल्याने होत असते.

धुम्रपान करणाऱ्‍यांमध्ये सुरकुत्या पडण्याचे प्रमाण धुम्रपान न करणाऱ्‍यांपेक्षा 10 पट अधिक आढळते.

आपल्या जीवनकालामध्ये आपले हृद्य सुमारे 212 लाख लीटर पंप करत असतो.

आपण अन्नाशिवाय कसेबसे एका महिन्यापर्यंत जिवंत राहू शकतो. तर पाण्याशिवाय एका आठवड्यापर्यंतच जिवंत राहू शकतो.

गर्भावस्थेत धुम्रपान करणाऱ्‍या महिलांमध्ये अकाली प्रसव आणि गर्भपात होण्याचा धोका अधिक असतो.

आपल्या नाकाचा आकार हा हाताच्या आंगठ्याच्या आकाराएवढाच असतो.

आपल्या मेंदुची वाढ आठराव्या वर्षापर्यंतच होते.

जवळजवळ 90% रोगांमध्ये मानसिक तनाव हे एक कारक असते.

आपल्या संपुर्ण त्वचेचे वजन हे आपल्या मेंदुच्या जवळजवळ दुप्यट असते.

सामान्यतः आपण खाल्लेले अन्न पचण्यासाठी सुमारे 12 तसांचा अवधी लागतो.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

हेडफोन्सच्या अतिवापरामुळे कानामध्ये जीवाणूसंसर्ग होण्याचा धोका 700 पट अधिक वाढतो.

जगामध्ये सध्या मधुमेह हे दृष्टिनाशाचे (Blindness) प्रमुख कारण बनत आहे.

साधारणपणे आपल्या मेंदुमध्ये 100 अब्ज न्यूरॉन्स असतात.