तुम्हाला माहित आहे का?
- सरासरीनुसार स्त्रीयां ह्या पुरूषांपेक्षा अधिक आयुर्मानाच्या असतात.
- अंदाजे 10 लाईटेचे बल्ब प्रकाशमान होतील एवढी उर्जा आपला मेंदु वापरत असतो.
- पूर्ण वाढ झालेल्या मेंदुचे वजन साधारणपणे 3 पाउंड (1300 ते 1400 ग्रॅम) असते.
- 130 डेसीबल पेक्षा अधिक आवाज हा शरीरासाठी घातक असतो.
- जर केवळ 8 ते 10 सेकंदसुद्धा मेंदुतील रक्तपुरवटा खंडीत झाला तर मनुष्य बेशुद्ध पडतो.
- ओठांजवळील त्वचा ही बोटांवरील त्वचेपेक्षा दोनशे पट अधिक संवेदनशील असते.
- जर आपल्या यकृताने काम करणे थांबवले तर 24 तासात मृत्यु ओढावतो.
- अधिक काळापर्यंत Tight pants घालण्याच्या सवयीमुळे पुरुषांमध्ये प्रजननसंबधी समस्या उत्पन्न होऊ शकतात.
- आपले डोळे जन्मापासून ते मृत्युपर्यंत एकाच आकाराचे असतात. त्यांच्या आकारात वयाबरोबर वाढ होत नाही तर लहानपणीच्या नाक आणि कानाच्या आकारात मोठेपणी मात्र बराच फरक झालेला आढळतो.
- दोन ग्लास मद्यपान केल्याने जेवढे नुकसान शरीराचे होते तेवढेच नुकसान 17 तास जागरण केल्याने होत असते.
- धुम्रपान करणाऱ्यांमध्ये सुरकुत्या पडण्याचे प्रमाण धुम्रपान न करणाऱ्यांपेक्षा 10 पट अधिक आढळते.
- आपल्या जीवनकालामध्ये आपले हृद्य सुमारे 212 लाख लीटर पंप करत असतो.
- आपण अन्नाशिवाय कसेबसे एका महिन्यापर्यंत जिवंत राहू शकतो. तर पाण्याशिवाय एका आठवड्यापर्यंतच जिवंत राहू शकतो.
- गर्भावस्थेत धुम्रपान करणाऱ्या महिलांमध्ये अकाली प्रसव आणि गर्भपात होण्याचा धोका अधिक असतो.
- आपल्या नाकाचा आकार हा हाताच्या आंगठ्याच्या आकाराएवढाच असतो.
- आपल्या मेंदुची वाढ आठराव्या वर्षापर्यंतच होते.
- जवळजवळ 90% रोगांमध्ये मानसिक तनाव हे एक कारक असते.
- आपल्या संपुर्ण त्वचेचे वजन हे आपल्या मेंदुच्या जवळजवळ दुप्यट असते.
- सामान्यतः आपण खाल्लेले अन्न पचण्यासाठी सुमारे 12 तसांचा अवधी लागतो.
- हेडफोन्सच्या अतिवापरामुळे कानामध्ये जीवाणूसंसर्ग होण्याचा धोका 700 पट अधिक वाढतो.
- जगामध्ये सध्या मधुमेह हे दृष्टिनाशाचे (Blindness) प्रमुख कारण बनत आहे.
- साधारणपणे आपल्या मेंदुमध्ये 100 अब्ज न्यूरॉन्स असतात.