प्रसूतीनंतर स्ट्रेच मार्क्स येण्याची समस्या :
गरोदरपणात, आपल्या वाढणाऱ्या शरीराच्या त्वचेवर ताण येत असतो. त्यामुळे प्रसूतीनंतर स्ट्रेच मार्क्स येत असतात. डिलिव्हरीनंतर ओटीपोट, मांडी आणि स्तनांवर स्ट्रेच मार्क्स येत असंतात. हा त्रास सर्वच स्त्रियांना असतो. हे स्ट्रेच मार्क्स हळूहळू कमी होत जातील.
प्रेग्नसीनंतर त्वचेवर स्ट्रेच मार्क्स येऊ नये यासाठी अशी घ्यावी काळजी :
योग्य आहार घ्या..
त्वचेची लवचिकता वाढवण्यासाठी उपयुक्त असणारा आहार समाविष्ट करू शकता. प्रामुख्याने व्हिटॅमिन-E आणि व्हिटॅमिन-A तसेच अँटिऑक्सिडंट्स आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड असणाऱ्या आहार पदार्थांचा उपयोग यावर होत असतो. यासाठी आहारात लिंबू, संत्री, मोसंबी, गाजर, बीट, पालक यांचा समावेश करावा.
पुरेसे पाणी प्या..
दिवसभरात साधारण 8 ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीर आणि त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. याशिवाय लिंबूपाणी, शहाळ्याचे पाणीही पिऊ शकता.
नियमित व्यायाम करा..
डिलिव्हरीनंतर 6 आठवडे झाल्यावर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम सुरू करा. व्यायामाने त्वचेची लवचिकता पूर्ववत होईल आणि रक्ताभिसरण सुद्धा सुधारेल.
बळांतपणात आलेले स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी हे करा घरगुती उपाय :
डिलिव्हरीनंतर काही महिन्यांनी हे स्ट्रेच मार्क्स आपोआप कमी होतात. यासाठी आपण खालील उपयोगी घरगुती उपायही करू शकता.
चंदन व हळदीचा लेप –
चंदन उगाळून त्यामध्ये हळद घालून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट स्ट्रेच मार्क्स असलेल्या ठिकाणी लावावी व ती सुखु द्यावी व थोड्या वेळाने ते धुवून काढावे.
तेल मालिश –
दररोज तेलाने मालीश केल्याने स्ट्रेच मार्क्स कमी होऊ शकतात. मसाज करण्यासाठी आपण खोबरेल तेल किंवा एरंडेल तेल, बदाम तेल, ऑलिव्ह ऑईल इत्यादी देखील तेल वापरू शकता.
अंड्यातील पांढरा भाग –
अंड्याचा पातळ पांढरट द्रव्य स्ट्रेच मार्क्स असलेल्या ठिकाणी चोळावा व थोडावेळ ते सुखु द्यावे. त्यानंतर ते धुवून काढावे. यामुळेही त्वचा मॉइश्चरायझ होऊन स्ट्रेच मार्क्स कमी होऊ शकतात.
कापलेला बटाटा –
बटाटा कापून तो स्ट्रेच मार्क्स असलेल्या ठिकाणी चोळावा व थोडावेळ ते सुखु द्यावे. त्यानंतर ते धुवून काढावे.
Read Marathi language article about pregnancy stretch marks and tips. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.