संडास साफ न होणे –
चुकीचा आहार, बैठी जीवनशैली, व्यायाम न करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे अशा कारणांनी संडासला साफ होत नाही. संडासला साफ न झाल्याने पोट गच्च होणे, पोटात गॅस होणे, डोके दुखणे, भूक कमी होणे, चिडचिड होणे, कंटाळा येणे अशा तक्रारी होत असतात.
संडासला साफ कशामुळे होत नाही..?
- फास्टफूड, जंकफूड, बेकरी प्रोडक्ट, मैद्याचे पदार्थ, पचनास जड असणारे पदार्थ, मांसाहार अधिक खाण्यामुळे संडास साफ होत नाही.
- पालेभाज्या कमी खात असल्यास संडास साफ होत नाही.
कमी पाणी पिण्याची सवय असल्यास त्यामुळेही संडास साफ होत नाही. - बैठे काम व व्यायाम न करणे अशा कारणांनी संडासला साफ होत नाही.
संडास साफ होण्यासाठी घरगुती उपाय –
संडास साफ होण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण घालून ते मिश्रण प्यावे. या आयुर्वेदिक उपायामुळे रोजच्यारोज सकाळी संडास साफ होण्यास मदत होते.
रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा एरंडेल तेल खाल्ल्यास संडास साफ होण्यासाठी मदत होते.
संडास साफ होण्यासाठी रोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात लिंबूरस मिसळून त्यात चमचाभर एरंडेल तेल घालून प्यावे. हे उपाय संडास साफ होण्यासाठी उपयोगी पडतात.
संडास साफ होण्यासाठी काय करावे..?
संडास साफ होण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश करा. तसेच पुरेसे पाणीही प्यावे. तर पचायला जड असणारे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, मैद्याचे पदार्थ, फास्टफूड खाणे टाळा.
हे सुध्दा वाचा – पोटात गॅस झाल्यावर काय करावे ते जाणून घ्या..
Read Marathi language article about Constipation Causes, Treatment and Home remedies. Last Medically Reviewed on February 28, 2024 By Dr. Satish Upalkar.