हिरड्यातून पू येणे (Gums pus) :
दातांची आणि हिरड्यांची योग्य काळजी व स्वच्छता न ठेवल्याने अनेक समस्या होऊ शकतात. हिरड्यातून पू येणे ही यामधीलचं एक समस्या आहे. अशावेळी हिरड्यातून पू येण्याबरोबरच हिरड्या सुजणे, हिरड्या दुखू लागणे असे त्रास होऊ लागतात.
हिरड्यातून पू येण्याची कारणे –
अनेक कारणांनी हिरड्यातून पू येऊ लागतो.
- हिरड्यांची स्वच्छता न ठेवल्याने तेथे इन्फेक्शन होऊन हिरड्यातून पू येऊ लागतो.
- हिरडीवर फोड आल्यास व तेथे इन्फेक्शन झाल्यास हिरड्यातून पू येऊ लागतो.
- हिरडीला जखम झाल्यास इन्फेक्शन होऊन हिरड्यातून पू येऊ लागतो.
- तसेच तंबाखू गुटखा यासारख्या व्यसनांमुळेही हिरड्यातून पू येण्याची समस्या होत असते.
हिरड्यातून पू येणे यावर घरगुती उपाय –
हिरड्यातून पू येत असल्यास तुरटीच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यासाठी कोमट पाण्यात थोडी तुरटी टाकून त्या पाण्याने गुळण्या करा.
हिरडीतून पू येत असल्यास लवंग तेल कापसाच्या बोळ्याने पू येणाऱ्या हिरड्यांच्या ठिकाणी लावावे.
मोहरीच्या तेलात हळद मिसळून मिश्रण तयार करावे. ह्या मिश्रणाने हिरड्यांना मसाज करावा. यामुळे हिरड्यांतून पू येणे थांबते.
ब्रश करण्यापूर्वी तोंडात एक चमचा खोबरेल तेल घेऊन ते तोंडाच्या आतील बाजूस फिरवत राहा. आणि 15 मिनिटांनी चूळ भरावी व ते तेल थुंकून टाका. यामुळे हिरड्या स्वच्छ होतात, तेथे इन्फेक्शन होत नाही.
हिरड्यांची अशी घ्यावी काळजी –
- तोंडाची स्वच्छता ठेवा.
- नियमित दात घासावेत.
- दात घासताना हिरड्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
- मऊ ब्रिसल्स असलेला टूथब्रश वापरावा.
- तंबाखू पानमसाला गुटखा धूम्रपान अशा व्यसनांपासून दूर राहा.
हे सुध्दा वाचा – हिरड्यातून रक्त येणे यावरील उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Gums pus causes & home remedies. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on February 24, 2024.