हिरड्यांची सूज –
आपल्या हिरड्यांना काहीवेळा सूज येत असते. हिरड्या सुजल्याने ब्रश करताना किंवा अन्नपदार्थ चावताना तेथे दुखू लागते.
हिरड्यांची सूज कमी करण्यासाठी घरगुती उपाय –
हिरड्या सुजल्यास कोमट पाण्यात मीठ मिसळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे हिरड्यांची सूज कमी होण्यास मदत होते.
दाढेत लवंग धरून ठेवल्याने हिरडीची सूज लवकर कमी होते.
आल्याच्या पेस्टमध्ये मीठ मिसळून ती पेस्ट सूज आलेल्या हिरडीस लावावी. दहा मिनिटांनी चूळ भरून तोंड धुवावे. यामुळे हिरड्याची सूज कमी होते.
हिरड्यांची सूज कमी करण्यासाठी तेथे थोडासा बेकिंग सोडा लावावा. हा घरगुती उपाय या त्रासावर चांगला आहे.
मोहरीच्या तेलात थोडी हळद मिसळून त्याचा लेप सुजलेल्या हिरड्यावर लावावा. यामुळेही हिरड्याची सूज कमी होते.
हिरड्यांची घ्यायची काळजी –
- तोंडाची स्वच्छता ठेवावी. यासाठी नियमित दात घासावेत.
- सकाळी व रात्री असे दोनदा दात घासावेत.
- दात घासताना हिरडीस इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
- मऊ ब्रिसल्स असलेला टूथब्रश वापरावा.
- तंबाखू, पानमसाला, गुटखा, धूम्रपान अशा व्यसनांपासून दूर राहा.
- घरगुती उपायांनी हिरड्यांची सूज कमी न झाल्यास डेटींस्टकडे जावे.
हे सुध्दा वाचा – हिरड्या मजबूत करण्यासाठी करायचे उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Swollen Gums home remedies. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on March 8, 2024.