उलटी होणे –
पचनसंस्थेतील गडबडी, अयोग्य आहार, मायग्रेन डोकेदुखी, गर्भावस्था अशा अनेक कारणांमुळे उलटी होते. सारख्या उलट्या झाल्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते. यासाठी उलटी झाल्यावर योग्य आहार घेणे गरजेचे असते.
उलटी झाल्यावर काय खावे..?
- उलट्या झाल्यावर सहज पचणारा हलका आहार घ्यावा.
- उलटी झाल्यावर वरणभात, सूप, चिरमोरे, लाह्या खाव्यात.
- उलटी झाल्यावर केळे, संत्री, सफरचंद यासारखी फळे खावीत.
- वरचेवर पाणी पीत राहावे.
- ताज्या फळांचा रस, शहाळ्याचे पाणी, साखर व मिठाचे पाणी, इलेक्ट्रॉल पावडरचे पाणी, लिंबूपाणी प्यावे.
उलट्या झाल्यावर काय खाऊ नये..?
- उलट्या झाल्यानंतर पचनास जड असणारे पदार्थ खाणे टाळा.
- तेलकट पदार्थ, मसालेदार पदार्थ, उग्र वासाचे पदार्थ खाणे टाळा.
- एकाचवेळी भरपेट खाण्यापेक्षा थोडे थोडे खावे.
- मद्यपान, सोडायुक्त कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे.
- जेवणानंतर लगेच झोपू नये.
उलटीवरील काही उपाय –
- उलट्या थांबत नसल्यास आल्याचा तुकडा मधाबरोबर खावा. यामुळे उलटी थांबण्यास मदत होते.
- उलट्या होत असल्यास आल्याचा तुकडा लिंबाच्या रसाबरोबर खावा.
- मळमळ व उलटी होत असल्यास लवंग व वेलदोडे चघळत राहावे.
- मळमळ होत असल्यास कुरकुरीत टोस्ट खावेत.
उलटी झाल्यावर काय करावे..?
उलट्या सतत होत असल्यास शरीरातील पाणी कमी होते. अशावेळी सोडियम, पोटॅशियम ह्या क्षार घटकांचे शरीरातील प्रमाण कमी होते. यासाठी गरम करून थंड केलेल्या 1 लिटर पाण्यात 6 चमचे साखर व अर्धा चमचा मीठ मिसळून ओआरएस द्रावण तयार करावे. यानंतर जेंव्हाजेंव्हा उलटी होईल तेंव्हातेंव्हा यातील थोडे थोडे पाणी प्यावे. यामुळे शरीरात डिहायड्रेशन होत नाही.
हे सुध्दा वाचा – उलट्या होण्याची कारणे व उपचार जाणून घ्या..
Read Marathi language article about after vomiting diet plan. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.