गरोदरपणात थकवा येणे व दम लागणे :
गर्भवती असताना थकल्यासारखे वाटणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. विशेषतः गर्भधारणेच्या पहिल्या काही आठवड्यांमध्ये आणि शेवटच्या आठवड्यात गरोदर स्त्रियांना दम लागणे, थकवा जाणवणे असे त्रास होत असतात.
प्रेग्नन्सीमध्ये थकवा किंवा अशक्तपणा का जाणवतो..?
गर्भावस्थेत पहिल्या तिमाहीत गर्भ रुजत असताना होणारे हार्मोनल बदल, प्लेसेंटाची होणारी निर्मिती यामुळे रक्तातील साखर (ब्लड शुगर) आणि रक्तदाब कमी होऊ शकतो. त्यामुळे आपणास खूप थकवा व दम लागत असतो. तसेच हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने ऍनिमिया होऊनही थकवा जाणवू शकतो.
गरोदरपणात दम लागणे यावरील उपाय :
1) योग्य आहार घ्या..
थकवा जाणवत असल्यास पौष्टिक आहार घ्यावा. आपल्या आहारामध्ये विविध प्रकारचे फळ आणि भाज्या तसेच लोह, प्रथिने आणि कॅल्शियम असणारे पदार्थ समाविष्ट करा. अधिकवेळ उपाशी राहू नये.
2) हलका व्यायाम करा..
प्रेग्नन्सीमध्ये हलका व्यायाम करणे आवश्यक असते. यासाठी मोकळ्या हवेत थोडे फिरायला जावे. यामुळे आपणास फ्रेश वाटेल आणि रात्री आपल्याला झोपसुद्धा चांगली येईल.
3) पुरेशी विश्रांती घ्या..
गर्भावस्थेत जड वस्तू उचलणे यासारखी थकवा आणणारी कामे करणे टाळावे. थकवा जाणवत असल्यास पुरेशी विश्रांती घ्यावी. दुपारच्या वेळीही थोडा आराम करावा.
4) लोहाच्या गोळ्या नियमित घ्या..
गरोदरपणात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने ऍनिमिया होऊनही थकवा जाणवत असतो. अशावेळी थकवा जाणवत असल्यास हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासून घ्यावे. गरोदरपणात ऍनिमिया होऊ नये यासाठी लोह व फॉलिक ऍसिडच्या गोळ्या दिल्या जातात त्या नियमित घ्याव्यात.
हे सुद्धा वाचा..
गरोदरपणात घ्यावयाची काळजी
Read Marathi language article about Fatigue during pregnancy. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.