बाळाला जुलाब होणे :
अनेक कारणांमुळे बाळाला पातळ जुलाब होत असते. प्रामुख्याने इन्फेक्शनमुळे असा त्रास बाळाला होत असतो. बाळाला पातळ जुलाब होत असल्यास डिहायड्रेशन होऊन धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी बाळाला जुलाब अतिसार होत असल्यास डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.
बाळाला पातळ जुलाब होत हे करा उपाय :
जुलाबामुळे बाळास सतत पातळ संडासला होत राहिल्यास डिहायड्रेशन होण्याचा अधिक धोका असतो. डिहायड्रेशनमुळे शरीरातील क्षार व पाणी कमी होत असते. यासाठी जुलाबमध्ये डिहायड्रेशन होऊ नये म्हणून तरल द्रव्यपदार्थ बाळास देणे व आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. जुलाबवरील कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बाळास देऊ नये.
सहा महिन्यापेक्षा कमी वयाच्या बाळास जुलाब होत असल्यास त्याला वरचेवर स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध द्यावे. यामुळे त्याच्यामध्ये डिहायड्रेशन होत नाही. जुलाब व उलट्या यांचा त्रास अधिक होत असल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावे.
जर सहा महिन्यापेक्षा अधिक वयाचे बाळ असल्यास त्याला जुलाब अतिसार होत असल्यास लहान बाळाला वरचेवर तरल पदार्थ, दूध, ओआरएस मिश्रण द्यावे. यामुळे बाळाच्या शरीरात जुलाबामुळे डिहायड्रेशन होणार नाही.
WHO ORS चे पाकीट घरी नसल्यास घरगुती मीठ, साखर व पाणी याद्वारे घरीच हे आपण बनवू शकतो.
यासाठी 1 ग्लास पाणी + 1 चमचा साखर + चिमटी मीठ हे मिश्रण आपण एका भांड्यात करून ठेवावे व थोडया थोडया वेळाने चमच्याने हे द्रावण बाळास पाजावे. शहाळाचे पाणीही देऊ शकता. तसेच त्यांना हलका आहारही खाण्यास द्यावा. जुलाब व उलट्या यांचा त्रास अधिक होत असल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावे.
बाळाला उलटी होणे यावरील उपाय जाणून घ्या.
Read Marathi language article about Diarrhea in Babies. Last Medically Reviewed on February 16, 2024 By Dr. Satish Upalkar.