Uric acid कशाने वाढते – uric acid वाढण्याची कारणे व उपाय

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

शरीरात uric acid अधिक वाढल्यास uric acid चे स्फटिक आपल्या सांध्यात जमा होतात. त्यामुळे या त्रासात सांध्यांच्या ठिकाणी सूज येते व अतिशय वेदना होत असतात. या त्रासाला गाऊट असेही म्हणतात. याठिकाणी uric acid कशाने वाढते व uric acid कमी करण्यासाठीचे उपाय यांची माहिती दिली आहे.

uric acid कशाने वाढते :

uric acid आपल्या रक्तात नैसर्गिकपणे तयार होत असते तसेच हाय-प्यूरिनयुक्त पदार्थ अधिक खाल्यामुळेही शरीरात uric acid चे प्रमाण वाढत असते. 

हाय-प्युरिनयुक्त पदार्थ म्हणजे दारू-बियर, मासे, सीफूड, कोळंबी, झिंगा, खेकडे, मांसाहारी पदार्थ, कोल्ड्रिंक्स, चरबीचे पदार्थ, मटार, बेकरी प्रोडक्ट या पदार्थात प्युरिनचे अधिक प्रमाण असते. असे प्यूरिनयुक्त पदार्थ अधिक खाल्यामुळे शरीरात uric acidचे प्रमाण वाढत असते.

वाढलेले uric acid कमी करण्यासाठी उपाय :

पुरेसे पाणी प्यावे..
uric acid चा त्रास असल्यास दिवसभरात पुरेसे म्हणजे साधारण 8 ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीरात वाढलेले अतिरिक्त uric acid लघवीवाटे शरीराबाहेर निघून जाण्यास मदत होते.

लसूण..
रक्तात वाढलेले uric acid कमी करण्यासाठी लसूण खूप उपयोगी पडते. यासाठी काही लसूण पाकळ्या चावून खाव्यात. तसेच लसूण पाकळ्या बारीक वाटून त्याचा लेप दुखणाऱ्या सांध्यावर लावणेही फायदेशीर ठरते.

आले..
आले खाण्यामुळे uric acid चे प्रमाण कमी होऊन सांध्यांना आलेली सूज कमी व वेदना कमी होतात. त्यामुळे या त्रासात आले खूप उपयुक्त ठरते. आल्यापासून बनवलेली सुंठही आपण खाऊ शकता. तसेच आले बारीक वाटून त्याचा लेप दुखणाऱ्या सांध्यांवर दररोज एकदा लावावा.

हळद..
हळदीत असणाऱ्या करक्यूमिन ह्या अँटी-ऑक्सिडंटमुळे सूज कमी होण्यास मदत होते. दोन कप पाण्यात अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा आल्याचा रस मिसळून मिश्रण 10 मिनिटे गरम करावे. हे मिश्रण थंड झाल्यावर प्यावे.

कोरपडीचा गर..
वेदना होणाऱ्या संध्याच्याठिकाणी कोरपडीचा गर (एलोविरा जेल) लावावा. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होईल.

एरंडेल तेलाचा मसाज..
युरिक अॅसिडमुळे दुखणाऱ्या संध्याच्याठिकाणी कोमट केलेले एरंडेल तेल लावून हलका मसाज करावा. यामुळेही संध्यातील सूज, वेदना कमी होऊन आराम मिळेल.

uric acid वर प्रभावी आयुर्वेदिक औषधे व उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Web title – Why increase uric acid information in Marathi language.

© कॉपीराईट सुचना -
कृपया ह्या वेबसाईटमधील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. येथील माहिती कॉपी करून आपल्या नावाने प्रसिद्ध किंवा शेअर किंवा Video बनवता येणार नाही.