पौष्टिक गहू
गहू हे स्निग्ध, शीत असून चवीस गोड असते. पचनाला किंचित जड असते. कफ वाढवणारा असून वात आणि पित्त कमी करणारे आहे. शक्तीवर्धक, वृष्य तसेच संधानकारी असल्याने मोडलेले हाड, जखम भरुन काढण्यास मदत करतो. गव्हामध्ये, गव्हाच्या कोंड्यामध्ये लोह,कॅल्शियम, ब1 जीवनसत्व, प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. मात्र कोंडा काढून टाकलेल्या मैदा किंवा गव्हाच्या कणीक मध्ये वरील पोषकतत्वे नसतात. असा मैदा, कोंडा रहित कणीक निसत्वयुक्त असून त्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत.
गव्हातील पोषणतत्वे –
100 ग्रॅम गव्हातील पोषकघटक
कॅलरी | 346 |
प्रथिने | 11.6 ग्रॅम |
स्नेह पदार्थ | 1.5 ग्रॅम |
कर्बोदके | 70 ग्रॅम |
तंतुमय पदार्थ | 1 ग्रॅम |
खनिजे | 1 ग्रॅम |
कॅल्शियम | 41 मि.ग्रॅम |
लोह | 5 मि.ग्रॅम |
फॉस्फरस | 306 मि.ग्रॅम |
हे सुद्धा वाचा..
तांदळातील पोषक घटक
ज्वारीतील पोषक घटक
जवसातील पोषक घटक
नाचण्यातील पोषक घटक
मुगातील पोषक घटक
Article about Wheat nutrition contents in Marathi.