‘अ’ जीवनसत्व कोणत्या पदार्थातून मिळते..?
फळे व भाज्या – हिरव्या पालेभाज्या, गाजर, पालक, कोथिंबीर, बीट, शेवगा इत्यादी.
प्राणिज पदार्थ – लोणी, अंडी, दूध, तुप, मासे, प्राण्यांच्या यकृतातून आपणास ‘अ’ जीवनसत्वाचा पुरवठा होतो.
व्हिटॅमिन-A ची कमतरता असल्यास होणारे परिणाम ;
‘अ’ जीवनसत्वाच्या अभावाने त्वचा आणि डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो,
- रातांधळेपणा,
- नेत्रशुष्कता,
- बुबुळावर व्रण होणे,
- डोळा लाल होऊन त्याला सुज येणे,
- त्वचा रुक्ष होणे,
- पायाच्या त्वचेवर खर जाणवते,
- रोग प्रतिकार शक्ती कमी होते.
व्हिटॅमिन-A ची दररोजची आवश्यकता –
प्रौढ स्त्री व पुरुषांस दररोज 5000 IU इतकी ‘अ’ जीवनसत्वाची गरज असते.
विविध आहारातील प्रमाण –
100 ग्रॅम लोणी 2499 IU
100 ग्रॅम प्राणिज यकृत 23000 IU
100 ग्रॅम गाजर 5000 IU
100 ग्रॅम कोथिंबीर शेवगा पालक 10000 IU
100 ग्रॅम अळू 20000 IU
100 ग्रॅम मेथी 3500 IU
Information about Vitamin-A in Marathi.