युरिक ऍसिडचे पथ्य आणि अपथ्य :
शरीरात अधिक प्रमाणात युरिक ऍसिड वाढल्यामुळे युरिक ऍसिडचे स्फटिक सांध्यामध्ये जमा होऊन त्याठिकाणी सूज व अतिशय वेदना होत असतात. याप्रकारच्या सांधेदुखीला गाऊट सांधेदुखी (Gout arthritis) असे म्हणतात. आपल्या रक्तात यूरिक ऍसिडचे प्रमाण अधिक वाढल्याने हा त्रास होत असतो. युरिक एसिडच्या त्रासात योग्य आहार घ्यावा लागतो. यासाठी येथे युरिक ऍसिडचे पथ्य आणि अपथ्य याची माहिती दिली आहे.
शरीरात युरिक एसिड वाढवणारे आहार पदार्थ :
प्यूरिनयुक्त पदार्थ अधिक खाल्यामुळे शरीरात यूरिक एसिडचे प्रमाण वाढत असते. हाय-प्युरिनयुक्त पदार्थ म्हणजे दारू, मासे, सीफूड, मांसाहारी पदार्थ, कोल्ड्रिंक्स, चरबीचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट या पदार्थात प्युरिनचे अधिक प्रमाण असते. असे प्यूरिनयुक्त पदार्थ अधिक खाल्यामुळे शरीरात यूरिक एसिडचे प्रमाण वाढत असते.
युरिक ऍसिड वाढल्यास काय खाऊ नये..?
ज्या पदार्थात प्युरिनचे पदार्थ अधिक असते अशा पदार्थाना हाय-प्युरिन फूड्स असे म्हणतात. यामध्ये,
• दारू-बियर सारखे अल्कोहोलिक मादक द्रव्ये,
• काही मासे, सीफूड आणि शेलफिश, कोळंबी, झिंगे, वाळवलेले मासे, शिंपले, खेकडा,
• मांसाहारी पदार्थ, मटण, प्राण्यांचे यकृत (काळीज), प्राण्यांची किडनी, चिकन, अंडी,
• कोल्ड्रिंक्स (शीतपेये),
• मटार, वाटाणा, वाल, पावटा, उडीद यासारखी पचनास जड असणारी कडधान्ये व मका,
• बेकरी प्रॉडक्ट्स, स्नॅक्स, पापड, जास्त फॅटयुक्त तेलकट चरबीजन्य पदार्थ या सर्व पदार्थांमध्ये प्युरिनचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण अधिक वाढत असते. यासाठी युरिक एसिडचा त्रास असल्यास हे सर्व पदार्थ खाणे टाळावेत.
युरिक ऍसिड कमी करण्यासाठी काय खावे..?
• यूरिक एसिडचा त्रास असल्यास योग्य आहार (diet plan) घेणे गरजेचे असते. आहारात हिरव्या भाज्या, फळभाज्या व ताजी फळे यांचा समावेश अधिक असावा.
• लसूण, आले, सुंठ, हळद, अक्रोड, केळी, सफरचंद हे आवर्जून खावेत.
• कमी फॅटयुक्त दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकता.
• दिवसभरात पुरेसे म्हणजे साधारण 8 ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीरात वाढलेले अतिरिक्त युरिक अॅसिड लघवीवाटे शरीराबाहेर निघून जाण्यास मदत होते.
यूरिक एसिडचा त्रास असल्यास त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व गुणकारी आयुर्वेदिक औषधे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.