Posted inDiseases and Conditions

लवकर केस पांढरे होण्याची कारणे व त्यावरील उपाय जाणून घ्या

केस पांढरे का व कशामुळे होतात..? तरुण वयात केस पांढरे होण्याची समस्या अनेकांना आहे. मेलेनिनची कमतरता, अनुवंशिकता, चुकीचा आहार, धूळ-प्रदूषण, मानसिक ताणतणाव अशा अनेक कारणांमुळे केस वेळेपूर्वी पांढरे होऊ लागतात. लवकर केस पांढरे होण्याची कारणे : मेलेनिन पिग्मेंटेशनच्या कमतरतेमुळे केसांचा रंग पांढरा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबरच शरीरातील मेलेनिनचं प्रमाण कमी होऊ लागते त्यामुळे केस पांढरे […]

Posted inBeauty Tips

चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची कारणे व त्यावरील घरगुती उपाय

चेहऱ्यावर पिंपल्स येणे – Acne vulgaris : चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येण्याची समस्या अनेक तरुण तरुणींमध्ये होत असते. पिंपल्सचा परिणाम चेहऱ्याच्या सौंदर्यावर होत असतो. याला तारुण्यपिटिका, मुरुमे, पिंपल्स (pimple) किंवा वैद्यकीय भाषेत acne vulgaris असेही म्हणतात. आपल्या त्वचेतील तेलग्रंथी जेव्हा हार्मोन्सच्या बदलामुळे किंवा बॅक्टेरियामुळे संक्रमित होतात तेंव्हा चेहऱ्यावर पिंपल्स निर्माण होतात. चेहऱ्यावर पिंपल्स अधिक असल्यास त्यावर […]

Posted inDiseases and Conditions

प्रवासात उलटी होत असल्यास हे करा घरगुती उपाय

प्रवासात उलटी होणे (Motion sickness) : आपल्यापैकी अनेकांना प्रवासादरम्यान मळमळ किंवा उलट्या होण्याची समस्या होते. लहान मुले आणि गरोदर स्त्रियांना हा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. या त्रासामुळे अनेकजण प्रवास करणेही टाळतात. या त्रासाला मोशन सिकनेस, गाडी लागणे अशा नावानेही ओळखले जाते. गाडी लागणे यावर हे करा घरगुती उपाय : आले (अद्रक) – प्रवासात मळमळ […]

Posted inDiseases and Conditions

सर्दीमुळे गच्च झालेले नाक मोकळे करण्यासाठी घरगुती उपाय

नाक गच्च होणे (Stuffy nose) : सर्दी झाल्याने नाक जाम किंवा गच्च होत असते. याला नाक चोंदणे असेही म्हणतात. वातावरणात बदल झाल्यामुळे, प्रामुख्याने थंडी आणि पावसाच्या दिवसात सर्वानाच सर्दी, खोकला आणि व्हायरल इंफेक्शनचा त्रास होत असतो. सर्दी किंवा पडशामुळे अनेकांना नाक चोंदण्याची समस्या होत असते. सर्दीमुळे नाक बंद झाल्यास अगदी श्वास घेतानाही त्रास होत असतो. […]

Posted inDiseases and Conditions

दात दुखीवर घरगुती उपाय आणि गोळी : Teeth pain

दातदुखी (Teeth pain) : दातदुखी कधीही होऊ शकते. दातदुखी होण्यासाठी अनेक कारणे जबाबदार असतात. विशेषतः दातांची योग्य काळजी न घेतल्याने दातांच्या तक्रारी होऊ शकतात. असह्य दातदुखी ही अगदी हैराण करून सोडत असते. तसेच दातांच्या ठिकाणी सळसळ होऊन अतिशय वेदना होत असतात. दातदुखी होण्याची कारणे : अनेक कारणांमुळे दातदुखी होऊ शकते यामध्ये, तोंडातील व हिरड्यातील बॅक्टेरिअल […]

Posted inBeauty Tips

घाम जास्त येण्याची कारणे व त्यावरील घरगुती उपाय

जास्त घाम येणे (Excessive sweating) : घाम हा सर्वच लोकांना येत असतो. घाम येण्याचे प्रमाण व्यक्तीनुसार कमी किंवा अधिक असू शकते. घाम आल्यामुळे आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित होण्यास मदत होते. काही लोकांना मात्र अधिक प्रमाणात घाम येत असतो. या स्थितीला हायपरहाइड्रोसिस डिसऑर्डर (Hyperhidrosis) असे म्हणतात. उन्हाळ्याच्या दिवसात, जास्त शारीरिक काम केल्यामुळे किंवा व्यायामामुळे, जास्त गरम […]

Posted inBeauty Tips

डोक्यात खाज येणे यावरील घरगुती उपाय – Head itching

डोक्यात खाज येणे – Head itching : डोक्यात होणाऱ्या खाजेमुळे सर्वचजण अगदी हैराण होतात. डोक्यामध्ये अनेक कारणांनी खाज येत असते. केसातील कोंडा, इन्फेक्शन, वातावरणातील बदल किंवा सोरायसिस सारखे विशिष्ट आजार अशी अनेक कारणे याला जबाबदार असतात. याशिवाय केसांच्या मुळांच्या कोरडेपणामुळेही डोक्यात खाज येत असते. अशी डोक्यात खाज येण्याची कारणे अनेक असतात. डोक्यात खाज येण्याच्या त्रासावर […]

Posted inDiseases and Conditions

घोळणा फुटणे : नाकातून रक्त येण्याची कारणे व त्यावरील उपाय

नाकातून रक्त येणे (Nosebleed) : नाकातून रक्त येण्याचा त्रास अनेकांना असतो. या त्रासाला घोळणा फुटणे असेही म्हणतात. अनेक कारणांमुळे नाकातून रक्त येऊ शकते. नाकातील त्वचा कोरडी झाल्यामुळेही (ड्राय झाल्यामुळे) नाकातून रक्त येऊ शकते. नाकातून रक्त का व कशामुळे येते..? आपल्या नाकात नाजूक पातळ त्वचेखाली अनेक रक्तवाहिन्या असतात. त्यामुळे त्याठिकाणी नख लागल्याने, जखम झाल्याने किंवा सर्दीमुळे […]

Posted inDiseases and Conditions

जुलाब थांबवण्यासाठी हे करा घरगुती उपाय

जुलाब होणे (Loose motion) : जुलाब लागल्यास वारंवार पातळ शौचाला होत असते. जुलाब होण्याची कारणे अनेक असून, प्रामुख्याने इन्फेक्शनमुळे वारंवार पातळ शौचास होत असते. वारंवार पातळ शौचाला लागल्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशनही होऊ शकते. यासाठी जुलाब वर वेळीच उपाय करणे आवश्यक असते. दिवसातून 5 किंवा त्यापेक्षा जास्तवेळा पातळ शौचास होणे चिंताजनक ठरू शकते. जुलाब […]

Posted inDiseases and Conditions

उलट्या थांबवण्यासाठी हे करा घरगुती उपाय

उलटी होणे (Vomiting) : उलटी होण्याचा त्रास सर्वानाच कधींनाकधी होत असतो. पचनसंस्थेतील गडबडी, अयोग्य आहार, दारू सारखे व्यसन अशा अनेक कारणांमुळे उलटी होऊ शकते. तसेच उलटी होणे हे अनेक आजारांमधील एक लक्षण ही असू शकते. उलटी होण्याची कारणे (Vomiting causes) : • पचनसंस्थेतील गडबडी, • जास्त प्रमाणात जेवल्यामुळे, • अपचन झाल्यामुळे, • अन्न विषबाधा झाल्याने […]