पंतप्रधान सुरक्षा विमा योजना मराठीत माहिती (PM Suraksha Bima Yojana in Marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana in Marathi

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना योजनेची माहिती :
केवळ 12 रूपये भरून एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही एक अपघात विमा योजना आहे. दरवर्षी नुतनीकरण आवश्यक. बँका व सार्वजनिक क्षेत्रातील इन्शुरन्स कंपन्या यांच्या सहयोगाने या योजनेचे परिचालन केले जाईल. 18 ते 70 वर्षे वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतात.

सहभाग कालावधी :
या योजनेत विमा संरक्षण हे 1 जून ते 31 मे या कालावधीत एक वर्षासाठी राहील. दरवर्षी 31 मेपर्यंत प्रीमियम भरता येईल. त्याची वाढीव मुदत ही 31 ऑगस्ट 2015 ही पहिल्या वर्षासाठीच राहील. योजनेत सहभागी होण्यासाठीचा काळ सुरुवातीला 3 महिन्यापर्यंत (31 नोव्हेंबर 2015) वाढवू शकते. नवीन विमा घेणाऱ्याला पुढच्या वर्षी सामील होता येणार आहे.

अपघात विमा भरपाई :

फायद्याचा तक्ता मिळणारी विमा रक्कम
   
अपघाती मृत्यू दोन लाख रूपये
दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात किंवा दोन्ही पायांचा वापर करण्याची क्षमता गमावणे. किंवा ‘एका डोळ्याची आणि एका पायाची’ किंवा एका हाताचा वापर करण्याची क्षमता गमावणे. दोन लाख रूपये
एका डोळ्याची पूर्ण आणि परत येऊ न शकणारी नजर किंवा एक हात वा एक पाय गमावणे. एक लाख रूपये

pradhan mantri suraksha bima yojana form download pdf details in marathi