उन्हाळा आणि त्वचेच्या समस्या :
उन्हाळ्याच्या दिवसात वाढत्या उन्हाचा परिणाम आपल्या त्वचेच्या आरोग्यावरही होत असतो. यासाठी उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्याची खूप गरज असते. कारण वाढत्या उन्हामुळे त्वचा काळवंडणे, त्वचा कोरडी होणे, त्वचेवर काळे डाग किंवा चट्टे पडणे, सनटॅन होणे, त्वचा तेलकट होणे, त्वचेवर सनरॅश किंवा पुरळ येणे, घामोळे येणे अशा अनेक त्वचेच्या तक्रारी उन्हाळ्यात होत असंतात. यासाठी याठिकाणी उन्हाळ्यात त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त उपाय दिले आहेत.
उन्हाळ्यात त्वचेची अशी घ्यावी काळजी :
दुपारच्या वेळी उन्हात फिरू नका –
उन्हाळ्यात दुपारच्या वेळी सुर्यकिरणे जास्त प्रखर असतात. त्या प्रखर उन्हामुळे त्वचा काळवंडते, त्वचेवर काळे डाग पडतात, त्वचा कोरडी पडते त्यामुळे उन्हाळ्यात दुपारच्या वेळी उन्हात फिरू नये.
घराबाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करावा –
कामानिमित्त उन्हाळ्यात घराबाहेर पडताना आपल्या त्वचेवर सनस्क्रीन लोशन लावावे. त्यामुळे कडक उन्हाच्या परिणामापासून आपल्या त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होते. सनस्क्रीन लोशनही चांगल्या कंपनीचे वापरा. विशेषतः SPF30 किंवा त्यापेक्षा जास्त SPF (Sun Protection Factor) असणारी सनस्क्रीन लोशन उन्हाळ्यात वापरावे. घराबाहेर पडण्यापूर्वी साधारण पंधरा मिनीटे आधी सनस्क्रीन लोशन त्वचेवर लावावी.
चेहऱ्यावर स्कार्फचा वापर करावा –
उन्हामुळे चेहऱ्याची त्वचा काळवंडण्याची व चेहऱ्यावर काळे डाग पडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे उन्हाचा थेट परिणाम आपल्या चेहऱ्यावर होऊ नये यासाठी तोंडाभोवती स्कार्फ गुंडाळावा.
पुरेसे पाणी प्यावे –
उन्हामुळे भरपूर घाम येत असतो. घामावाटे शरीरातील पाणी कमी होत असते. पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशन होऊ शकते त्यामुळे त्वचा कोरडी पडण्याची समस्या होऊ शकते. यासाठी उन्हाळ्यात पुरेसे पाणी पिणे गरजेचे असते. साधारण 8 ते 10 ग्लास पाणी दिवसभरात प्यावे. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहिलच शिवाय शरीरातील अशुद्धी घाम व लघवीवाटे निघून जाण्यास मदत होईल. पर्यायाने त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल म्हणून उन्हाळ्यात पुरेसे पाणी प्यावे. पाण्याव्यतिरिक्त नारळपाणी, फळांचे ज्यूस, लिंबूपाणी, कोकमचे सरबतही आपण उन्हाळ्यात पिऊ शकता.
कोरपडीचा गर –
उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी आठवड्यातून एकदा त्वचेला कोरफडीचा गर लावा आणि 15 मिनीटांनी पाण्याने धुऊन टाकावा. तेलकट त्वचेवर कोरफडीचा गर खूपच उपयोगी ठरतो. यामुळे त्वचेवरील धुळ आणि तेलकटपणा कमी होण्यास मदत होते.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुद्धा वाचा..
उन्हाळ्यात कोणता आहार घ्यावा ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.