सुकन्या समृद्धी योजना मराठीत माहिती (Sukanya Samriddhi Yojana)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Sukanya Samriddhi Yojana in Marathi information

सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची नवजात कन्यांच्या पालकासाठी राबविल्या जात असलेली एक योजना आहे. या योजनेस भारत सरकारचे पाठबळ आहे. ही योजना नवजात कन्येच्या पालकांना त्या मुलीचे शिक्षणासाठी व लग्नासाठी फंड जमा करण्यासाठी प्रोत्साहन देते.

ही योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदीद्वारे दि. 22 जानेवारी 2015 ला विमोचित केल्या गेली.सध्या या योजनेवर मिळणारे व्याज हे 8.6% (आर्थिक वर्ष 2016-17साठी) इतके आहे. या योजनेत करलाभपण आहे. हे खाते कोणत्याही डाक कार्यालयात किंवा कोणत्याही अधिकृत बँकेच्या शाखेत उघडल्या जाऊ शकते

केंद्र सरकारने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ आंदोलन चालू केले. त्या अंतर्गत मुलीच्या शिक्षणाची सोय व तिच्या लग्नासाठी तरतूद करण्यासाठी, पालकांना उपयुक्त योजना सुरू केली. मुलीच्या अठराव्या वर्षी 50% रक्कम तिच्या शिक्षणासाठी काढता येते व बाकी रक्कम 21 वर्षांनंतर किंवा लग्नाच्या वेळेस (18 ते 21 वर्षांदरम्यान) काढता येते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

मुलीच्या दहाव्या वर्षांपर्यंत खाते उघडता येते फक्त दोन मुलीसाठीच खाते उघडता येते. एका मुलीसाठी कोठेही फक्त एकच खाते उघडता येते. दुसऱ्या जुळ्या मुलींसाठी किंवा तिळ्यांसाठी नियमांत शिथिलता आहे. मुलगी दहा वर्षांची होईपर्यंत खाते उघडता येते. 2015-16 वर्षांसाठी या खात्यावर व्याज 9.2% आहे. दरवर्षी व्याजाचा दर इतर व्याजदरांप्रमाणे जाहीर केला जाईल. व्याज चक्रवाढ पद्धतीने दिले जाते. पोस्ट ऑफिस किंवा सरकारी बँकाच्या कोणत्याही शाखेत हे खाते उघडता येते.

एका आर्थिक वर्षांत किमान गुंतवणूक रू. 1000/- व कमाल गुंतवणूक रू. 150000/- पर्यंत करता येते. मात्र दरवर्षी किमान हजार रुपये न भरल्यास 50 रूपये दंड आकारला जातो. पालकांना 80 सी कलमाअंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर प्राप्तिकरांतून वजावट मिळते. योजनेतून व्याज लाभ करमुक्त आहे. साधारणपणे मुलांचे उत्पन्न वडिलांच्या उत्पन्नात मिळवून त्यावर वडिलांना प्राप्तिकर भरावा लागतो. परंतु या योजनेत गुंतवलेली रक्कम व व्याज वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्याखेरीज मुलीला मिळणार नाही. त्यामुळे मुलगी सज्ञान झाल्यावर एकत्रित उत्पन्नावर कर आकारण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

sukanya samriddhi yojana in marathi pdf pradhan mantri balika samridhi yojana sbi sukanya yojana calculator form sukanya yojana details in Marathi