स्तनपान सोडवणे (Weaning) :
नवजात बाळासाठी आईचे दूध हेचं सर्वोत्तम असे अन्न असते. त्यामुळे बाळाला पहिल्या सहा महिन्यांसाठी फक्त आईचे दूध दिले जाते. सहा महिन्यांनंतर, हळूहळू आईचे दूध देणे कमी करणे आवश्यक आहे, जेणेकरून बाळाला ठोस आहार खाण्याची सवय लागून सर्व पोषक द्रव्ये मिळतील. मात्र बर्याचदा प्रयत्न करूनही बाळाची आईचे दूध पिण्याची सवय कमी होत नाही. यासाठी येथे बाळाकडून आईचे दूध (स्तनपान) सोडवण्यासाठीचे उपाय येथे दिले आहेत.
लहान बाळाला स्तनपान देणे कधी थांबवावे..?
बाळ जन्मल्यानंतर सुरवातीचे सहा महिने बाळास केवळ आईचे दूध देणे आवश्यक असते. त्यावेळी बाळास आईच्या दुधातून सर्व ती पोषकतत्वे मिळत असतात. मात्र सहा महिन्यानंतर जसजसे बाळ वाढत असते, तसतसे त्यास अधिक पोषण मिळण्याची आवश्यकता असते.
अशावेळी, केवळ आईचे दूध हे त्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुरेसे पडत नाही. त्यामुळे सहा महिन्यांनंतर, हळूहळू आईचे दूध देणे कमी करणे व इतर ठोस आहार देणे गरजेचे असते. तसेच ठोस आहार देत असताना त्याच्या जोडीला बाळ किमान एक वर्षांचे होईपर्यंत स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध देणे अधिक चांगले असते.
आईचे दूध पिण्याची बाळाची सवय सोडवण्याचे उपाय :
बाळाचे लक्ष दुसरीकडे वळवा..
बाळ स्तनपानासाठी आग्रह धरत असल्यास त्याचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करा. यासाठी त्याला रंगीबेरंगी खेळणी दाखवा, बाळाबरोबर खेळा किंवा जवळच्या लहान मुलांना बोलावून बाळाला त्यांच्याबरोबर खेळू द्यावे. जेणेकरून खेळण्याच्या नादात बाळ आईचे दूध पिण्याची मागणी करणार नाही.
बाळाला छान छान पदार्थ खाऊ घाला..
बाळास ठोस आहार देताना छान छान पदार्थ खाऊ घालावेत. त्यामुळे बाळाला ते पदार्थ आवडू लागतील व बाळ आईचे दूध सोडून ते पदार्थचं खाऊ लागेल.
बाळाला समजावून सांगा..
बाळाला काही गोष्टी समजत असल्यास त्याला समजावून सांगावे. यासाठी गोष्टींचा आधार घेऊ शकता, दूध देताना आईला त्रास होतो हे सांगू शकता किंवा बाळ आत्ता मोठे झाले आहे असे सांगून त्याला समजावू शकता.
स्तनपान करणे थांववल्यावर हळूहळू स्तनातील दूध कमी होऊ लागते. दूध येणे पूर्णपणे थांबण्यासाठी काही आठवडे ते एक किंवा दोन वर्षेही लागू शकतात.
स्तनपानाऐवजी आपल्या बाळाला काय देता येईल..?
फॉर्म्युला दूध – जर बाळाचे वय सहा महिने ते एक वर्षाचे असल्यास फॉर्म्युला दूध देऊ शकता.
गायीचे दूध – जर बाळ एका वर्षापेक्षा मोठे असल्यास गाय किंवा म्हैसीचे दूध देऊ शकता.
Weaning – stopping breastfeeding information in Marathi.
प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.