पोटाचा कर्करोगात कोणकोणती लक्षणे जाणवतात

2346
views

पोटाच्या कर्करोगाची लक्षणे :
पोटाच्या कर्करोगाची सुरवात शरीरात मंद गतीने होत असते. अधिकांशवेळा कोणत्याही लक्षणांशिवाय पोटाचा कर्करोग अधिक वाढलेला असतो, तो द्वितियक अवस्थेमध्ये पोहचलेला असतो.

सामान्य लक्षणे –
◦ पोटांमध्ये, उदरामध्ये वेदना होणे,
◦ अरुची, भुक मंदावणे,
◦ भोजननंतर बैचेनी, अस्वस्थता होणे,
◦ मळमळणे, उलटी होणे, उलटीमध्ये रक्त आढळणे,
◦ वजन कमी होणे, रक्तक्षीणता, दौर्बल्य,
◦ अपचनाच्या तक्रारी उद्भवणे,
◦ मलामध्ये रक्त आढळणे यासारखी लक्षणे सामान्यतः पोटाच्या कर्करोगामध्ये आढळतात.
पोटाच्या कैन्सरची बहुतांश लक्षणे ही द्वितीयक अवस्थेमध्येच (Advanced stage) आढळतात.

.
पोटाच्या कॅन्सरचे निदान कसे करतात –
रक्तीउलटी , मलातून रक्त येणे यासारख्या लक्षणांद्वारे पोटाच्या कर्करोगाची आशंका येते,
यासाठी
◦ रक्तपरिक्षण,
◦ मलपरिक्षण,
◦ एक्स रे परिक्षा,
◦ Gastroscopy,
◦ एण्डोस्कोपी परिक्षणाद्वारे याचे निदान केले जाते.

कोणत्याही कर्करोगामध्ये निदानाचे अत्यंत महत्व आहे. प्राथमिक अवस्थेतील कैन्सर योग्य उपचारांद्वारे बरा होतो. यासाठी कैन्सरचे वेळीच निदान करणे गरजेचे आहे.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.