पोटाचा कॅन्सर (Stomach cancer) :

पोटातील कॅन्सरला Stomach cancer किंवा गॅस्ट्रिक कॅन्सर असेही म्हणतात. यामध्ये पोटाच्या अस्तरात कॅन्सरच्या पेशींची वाढ होत असते.

पोटाचा कॅन्सर लक्षणे (Stomach cancer symptoms) :

पोटाच्या कॅन्सरची सुरवात शरीरात मंद गतीने होत असते. त्यामुळे पोटाच्या कॅन्सरमध्ये सुरुवातीस काहीच लक्षणे दिसून येत नाहीत, पण जसजसा पोटातील कॅन्सर वाढू लागतो तसतशी खालील लक्षणे दिसून यायला लागतात.

यासारखी लक्षणे पोटाच्या कॅन्सरमध्ये जाणवू शकतात. पोटातील कॅन्सरची लक्षणे ही अनेकदा सेकंड स्टेजमध्ये कॅन्सर गेल्यावरचं अधिक जाणवतात.

पोटाचा कॅन्सर कसा होतो ..?

पोटाच्या अस्तरात हळूहळू कॅन्सरच्या पेशींची वाढ होऊन पोटाचा कॅन्सर होतो. यामुळे त्याठिकाणी अनियंत्रितपणे कॅन्सरच्या पेशींची वाढ होऊ लागते, त्यामुळे तेथील निरोगी पेशी कॅन्सरजन्य होतात आणि तेथे ट्युमर निर्माण होतात. अशाप्रकारे पोटाचा कॅन्सर होतो.

पोटाच्या कॅन्सरची सुरवात अगदी हळूहळू होत असते. पोटाच्या कॅन्सरची वाढ होत असताना काहीवेळा रुग्णाला कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. अधिकांशवेळा कोणत्याही लक्षणांशिवाय पोटाचा कॅन्सर अधिक वाढलेला असतो, तो सेकंड स्टेजमध्ये पोहचलेला असतो. आणि सेकंड स्टेजमध्ये गेलेल्या कॅन्सरवर उपचार करणे कठीण होऊन जाते. यासाठी कॅन्सरचे सुरुवातीच्या स्टेजमध्येचं निदान होऊन उपचार करणे आवश्यक असते.

पोटाच्या कॅन्सरची कारणे (Stomach cancer causes) :

पोटाचा कॅन्सर का व कशामुळे होतो याची निश्चित अशी कारणे अजूनही स्पष्ट झालेली नाहीत. मात्र असे काही घटक (Risk factors) आहेत की ज्यामुळे पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो. ते घटक पुढीलप्रमाणे आहेत.

  • अनुवंशिक कारणामुळे, रक्तातील नात्यामध्ये जसे आईवडील, भाऊबहिण यांच्यापैकी कोणास पोटाचा कॅन्सर झालेला असल्यास पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक असू शकतो.
  • ‎जुनाट पेप्टिक अल्सर, Pernicious anemia (B-12 Vitamin च्या कमतरतेने होणारा अनेमिया) या रोगांच्या दुष्परिणामातून पोटाचा कॅन्सर होण्याची अधिक शक्यता असते.
  • ‎धुम्रपान, तंबाखू आणि मद्यपान यांच्या व्यसनामुळे पोटाच्या कॅन्सरचा धोका अधिक वाढतो.
  • ‎पोटाचा क्रोनिक इरिटेशन झाल्याने, मुख्यतः अत्यधिक मद्यपान, वेदनाशामक औषधांचा अतिवापर, अतिगरम, तीक्ष्ण पदार्थांच्या सेवनाने पोटात Irritation होत असते.
  • ‎Helicobacter Pylori या बॅक्टरीयाच्या इन्फेक्शनमुळे पोटाला सूज येते व अशावेळी पोटातील कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
  • ‎अतिखारट पदार्थ, अतितिखट, मसालेदार आहाराच्या अधिक सेवनाने पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक वाढते.
  • ‎आहारातील तंतुमय पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे यांच्या कमतरतेमुळे पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक निर्माण होतो.

तसेच पोटाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण ‘A’ रक्तगटाच्या लोकांमध्ये सर्वाधिक आढळते. वयाचा विचार केल्यास वयाच्या 40शी नंतर हा कॅन्सर अधिक होण्याची शक्यता असते. तर स्त्रीयांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात पोटाचा कॅन्सर आढळतो.

पोटातील कॅन्सर च्या स्टेजेस (Stages) –

पोटातील कॅन्सरची शरीरात सुरवात हळूहळू होते. त्याचवेळीच म्हणजे कॅन्सरच्या पहिल्या स्टेजमध्येच त्याचे निदान करुन, वेळीच उपचारांनी कॅन्सरचा अटकाव करणे आवश्यक असते. अन्यथा पोटाचा कॅन्सर गंभीर बनून संपुर्ण पोटाला बाधीत करतो, रक्ताद्वारे हा कॅन्सर यकृत, फुफ्फुसे, मेंदु, किडन्या आणि हाडांमध्ये पसरतो व पोटाचा कॅन्सर दुसऱ्या स्टेजमध्ये पोहोचतो. आणि ह्या स्टेजमधील कॅन्सरला उपचार करून बरा करणे अवघड होऊन जाते.

पोटाच्या कॅन्सरचे निदान (Diagnosis) –

पेशंट हिस्ट्री, रुग्णाची शारीरिक तपासणी करून डॉक्टर याच्या निदानास सुरवात करतील. शारीरिक तपासणीमध्ये पोट तपासून त्यावर सूज किंवा पोटात गाठ आली आहे का ते पाहतील. उलटीतुन रक्त येणे, मलातून रक्त येणे यासारख्या लक्षणांद्वारे आपल्या डॉक्टरांना पोटाच्या कॅन्सरची आशंका येते. तसेच, अचूक निदानासाठी खालील चाचण्याही करायला सांगतील.

एन्डोस्कोपी तपासणी – यामध्ये दुर्बणिीद्वारे पोटाच्या आतील भागाचे निरीक्षण करून कॅन्सरची गाठ आहे का ते पाहिले जाते.

लॅप्रोस्कोपी तपासणी – पोटाला छोटेसे छिद्र पाडून लॅप्रोस्कोप आत घातला जातो व आजूबाजूला गाठी असल्यास त्या गाठीचा छोटासा तुकडा बायोप्सी परीक्षणासाठी काढून घेतला जातो. तसेच रक्त तपासणी, पोटाचा सीटी स्कॅन, एक्स-रे याद्वारे पोटाच्या कॅन्सरचे निदान केले जाते.

पोटाचा कॅन्सर आणि उपचार (Stomach cancer Treatments) :

पोटाच्या कॅन्सरवर उपचार हा कोणत्या स्टेजमध्ये कॅन्सर आहे यावर अवलंबून असतात. गाठेचे स्वरूप, कॅन्सर किती पसरलेला आहे याप्रमाणे उपचार पद्धती ठरते. शस्त्रक्रिया ही पोटाच्या कॅन्सरची प्रमुख चिकित्सा आहे.

जर गाठ कमी प्रमाणात असेल तर ऑपरेशन करून पोटाचा काही भाग गाठीसकट काढला जातो. जर गाठ थोड्या जास्त प्रमाणात असेल तर ऑपरेशन करून पोटाचा जास्त भाग गाठीसकट काढला जातो व राहिलेले पोट आतड्याशी जोडले जाते.

जर संपूर्ण पोटात कॅन्सर पसरला असेल तर ऑपरेशन करून संपूर्ण पोट काढले जाते व त्यानंतर आतडे हे डायरेक्ट अन्ननलिकेशी जोडले जाते. तसेच ऑपरेशन करण्याआधी आणि ऑपरेशन झाल्यानंतर केमोथेरपी केली जाते.

पोटाचा कॅन्सर बरा होतो का ..?

जर सुरवातीच्या अवस्थेत पोटाच्या कॅन्सरचे निदान झाल्यास व त्यावर योग्य उपचार झाल्यास निश्चितच पोटाचा कॅन्सर बरा होतो. दुसऱ्या स्टेजमधील पोटाचा कॅन्सर असल्यास किंवा तो कॅन्सर शरीराच्या इतर भागातही पसरला असल्यास अशावेळी उपचार करून पोटाचा कॅन्सर बरा करणे खूप अवघड असते. त्यामुळे वेळीच याचे निदान होणे अत्यंत आवश्यक असते.

पोटाचा कॅन्सर होऊ नये यासाठी घ्यायची काळजी :

  • धुम्रपान, मद्यपान, तंबाखू इ. व्यसनांपासून दूर रहावे.
  • ‎अतिखारट पदार्थ, अतितिखट, जास्त मसालेदार आहाराचे सेवन मर्यादित करावे.
  • ‎हिरव्या पालेभाज्या, विविध फळे, तंतुमय पदार्थांचा आहारात अधिक समावेश करावा.
  • ‎उघड्यावरील आहार, दुषित आहारांचे सेवन करु नये.
  • ‎दुषित पाण्याचे सेवन करु नये.
  • ‎वजन आटोक्यात ठेवा. यासाठी चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळा. तसेच नियमित व्यायाम करा.
  • ‎डॉक्टरांच्या सुचनेशिवाय परस्पर औषोधोपचार करणे टाळावे. उठसूठ वेदनाशामक औषधे घेणे टाळा.
  • ‎आणि नियमित वैद्यकिय तपासणी करुन घ्या.

खालील कॅन्सर प्रकारांची माहितीसुद्धा वाचा..

Read Marathi language article about Stomach Cancer Causes, Symptoms, Treatments and Prevention tips.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.