रांजणवाडी हा डोळ्यांचा एक आजार असून याला वैद्यकीय भाषेत Stye असे म्हणतात. हा आजार प्रामुख्याने बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे होत असतो. याशिवाय डोळ्यांची स्वच्छता न ठेवणे, धूळ व मेकअपच्या परिणामामुळे, सतत डोळे चोळणे, चष्म्याचा बदलता नंबर यामुळेही रांजणवाडी होऊ शकते. याठिकाणी रांजणवाडी लक्षणे याविषयी माहिती दिली आहे.
रांजणवाडी लक्षणे :
रांजणवाडीमध्ये डोळ्यांच्या पापणीच्या ठिकाणी बारीक फोड किंवा पुळी येते. त्या पुळीमुळे पापणीच्या ठिकाणी दुखणे, सूज येणे, पू होणे अशी लक्षणे रांजणवाडीमध्ये असतात.
रांजणवाडीच्या त्रासात काय करावे..?
• रांजणवाडीच्याठिकाणी अँटी-बॅक्टेरिअल क्रीमचा वापर करावा.
• एरंडेल तेलात भिजलेला कापसाचा बोळा रांजणवाडीच्या ठिकाणी फिरवावा.
• खारकेची बी उगाळून त्याठिकाणी लेप लावावा.
• लवंग पाण्यात उगाळून त्याचा लेप रांजणवाडीच्या ठिकाणी दिवसातून 2 वेळा लावावा.
• किसलेला बटाटाही रांजणवाडीच्या ठिकाणी लावू शकता.
• लसूण पाकळीचा तुकडा रांजणवाडीवर लावावा.
Stye symptoms Marathi, Ranjanwadi symptoms in Marathi.