सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे काय..?
आहारातील स्निग्ध पदार्थ किंवा मेद, चरबीयुक्त पदार्थ ही मुख्यतः दोन प्रकारची असतात.
1) सॅच्युरेटेड फॅट्स
2) अनसॅच्युरेटेड फॅट्स
जे स्निग्ध पदार्थ सामान्य तापमानामध्ये ठेवल्यास गोठतात त्यांना सॅच्युरेटेड फॅट्स असे म्हणतात. या प्रकारच्या स्निग्ध पदार्थांमध्ये मुख्यतः प्राणीज स्निग्ध पदार्थांचा समावेश होतो.
उदाहरण – लोणी, तूप, साय, पणीर, प्राण्यांची चरबी, वसा, अंड्यातील पिवळा बलक या प्राणीज आहार घटकांचा तर खोबरेल तेल, पामतेल, वनस्पती तूप ह्या वनस्पतीज आहार घटकांचा समावेश सॅच्युरेटेड फॅट्स मध्ये होतो.
तर अनसॅच्युरेटेड फॅट्स हे सामान्य तापमानामध्ये ठेवल्यास गोठत नाहीत. उदाहरणार्थ तीळ तेल, सोयाबीन तेल, करडई तेल, शेंगातेल, मोहरी तेल इत्यादी.
सॅच्युरेटेड फॅट्स आणि आरोग्य :
योग्य प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट्सचा समावेश आपल्या आहारात केल्यास त्यांचा विशेष लाभ आपल्या शरीराला होतो. मात्र सॅच्युरेटेड फॅट्सच्या अतिसेवनामुळे अत्यंत गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात. कारण सॅच्युरेटेड फॅट्सच्या अतिसेवनामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. वाढलेल्या कोलेस्टेरॉलमुळे धमनीकाठिन्यतः, उच्चरक्तदाब, हृद्यविकार यासारखे गंभीर विकार उत्पन्न होतात.
सॅच्युरेटेड फॅट्सच्या अधिक सेवनाने होणाऱ्या खालील आजारांचीही माहिती वाचा..
हार्ट अटॅकविषयी माहिती
हाय ब्लडप्रेशरचा त्रास
पक्षाघात – लकवा