सफेद केसांची समस्या व त्यावर उपाय :
बदलती जीवनशैली आणि चुकीचे खाद्यपदार्थ खाण्याची सवय, प्रदूषण, ताणतणाव यामुळे सफेद केस होण्याची समस्या झपाट्याने वाढत आहे. यासाठी येथे सफेद केस काळे करण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी माहिती सांगितली आहे. या घरगुती उपाय आणि सोप्या टिप्स यांमुळे सफेद केस काळे होण्यासाठी निश्चितच मदत होईल.
सफेद केस काळे करण्यासाठी हे करा उपाय..
आवळा –
नारळाच्या तेलात आवळा पावडर मिसळून मिश्रण उकळून घ्या. आवळा असलेले हे तेल रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या केसांना लावावे. याच्या नियमित वापराने सफेद केस काळे होण्यासाठी मदत होते.
कडीपत्ता –
कडीपत्ता खोबरेल तेलात घालून ते उकळावा. तयार केलेले तेल रोज रात्री आपल्या केसांना लावून मसाज करावा. यामुळेही सफेद केस काळे होण्यास मदत होते.
भृंगराज –
भृंगराज किंवा माक्यापासून बनवलेले तेल केसांना लावून मसाज करावा. यामुळेही आपले सफेद झालेले केस नैसर्गिकरीत्या काळे होण्यास मदत होते.
चहापावडर –
चहा, कॉफी किंवा ब्लॅक टीच्या चोथा केसांवर चोळावा आणि थोड्या वेळाने केस धुवावेत. या नैसर्गिक उपायानेही सफेद केस काळे होतात.
कांदा –
कांद्याची बारीक पेस्ट करुन त्यात लिंबाचा रस घालावा. ही तयार केलेली पेस्ट केसांना लावावी. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवावेत. या घरगुती नैसर्गिक उपयाचाही सफेद केस काळे होण्यासाठी चांगला उपयोग होतो.
कोरफड –
कोरफडीचा गर काढून त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून ते मिश्रण केसांना लावावे. काही वेळानंतर केस धुवून टाकावेत.
अशाप्रकारे वरील सर्व उपायांमुळे सफेद केस काळे होण्यास मदत होईल.