रस्त्यावरील अपघात

2780
views

आज प्रचंड प्रमाणात वाढलेल्या वाहतूकीमुळे दररोज रस्त्यावर अपघात होऊन अनेकजण गंभीर जखमी आणि मृत्युमुखी पडत आहेत.

हे करा..
• गंभीर अपघात झाल्यास 108 ह्या नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलवा.
• जर डोक्याला किंवा पाठीच्या कण्याला इजा झाली असेल तर डोके किंवा मान हलवू नका.
• ‎खरचटले किंवा मुरगळले असेल तर तो भाग थंड पाण्यात बुडवा.
• ‎जर अपघातग्रस्त व्यक्तीला वेदना होत असतील तर तिचे हाड मोडलेले असू शकते, इजा झालेला भाग हलवू नका.
• ‎जखमी झालेला अवयव वर उचलून धरा जेणेकरून रक्तप्रवाह कमी होईल.
• ‎रक्त येत असल्यास त्यावर पट्टी बांधा.
• ‎जखमी व्यक्तीला ताबडतोब डॉक्टरांची मदत मिळवून द्या.

साधे नियमही पाळा :
• वाहतुकीचे नियम पाळा.
• ‎गाडीमध्ये प्रथमोपचार पेटी ठेवा.
• ‎मद्यपान करून वाहने चालवू नका. गाडी चालवताना फोनवर बोलू नका. सीटबेल्टचा वापर करा.
• ‎दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करा.
• ‎आपण नेहमी रस्त्याच्या बाजूने वाहतुकीकडे तोंड करून चालले पाहिजे.
• ‎रस्ता ओलांडताना नेहमी पादचार्‍यासाठी असलेल्या पट्ट्यांचा उपयोग करावा.
• ‎मुलांना रस्त्याजवळ खेळू देऊ नका.

माणुसकी हरवत चालली आहे..!
रस्त्यावर अपघात झाल्यास अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करण्यापेक्षा त्यांचे फोनवर फोटो काढण्याकडेचं लोकांचे लक्ष असते.
ते फोटो काढून व्हाट्सएप, Youtube, ट्विटरवर अपलोड करून स्वतःला ‘स्मार्ट’ समजत असतात हे करणे योग्य आहे का?
प्रत्येकाच्या बाबतीत असा अपघात होऊ शकतो. आपले पाहिले प्राधान्य हे अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करणे हे असले पाहिजे. ‎जखमी व्यक्तीला ताबडतोब डॉक्टरांची मदत मिळवून द्या.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.