प्रसूतीच्या वेळेस ही लक्षणे असणे धोकादायक असते (Delivery Complications)

Complications During Pregnancy and Delivery in Marathi

प्रसूतीच्या वेळेतील धोकादायक लक्षणे :
• ज्या स्त्रियांना गरोदरपणात आनिमिया (पंडुरोग), अशक्तपणा असल्यास,
• ‎हाता- पायावर, चेहऱ्यावर सूज आलेली असल्यास,
• विश्रांती घेतानासुद्धा श्वास घ्यायला त्रास होणे, आकडी येणे, नीट न दिसणे, उलटया, गंभीर स्वरुपाची डोकेदुखी असल्यास,
• ‎आधीचे बाळंतपण सुरक्षित झाले नसल्यास,
• ‎डिलीव्हरीच्या आधी रक्तस्त्राव व्हायला लागल्यास,
• ‎प्रसूतीच्या वेळी अचानक कळा बंद झाल्यास,
• ‎नाडीचा वेग वाढल्यास,
• डिलीव्हरीच्या कळा 12 ते 24 तासांपेक्षा जास्त वेळ येत असतील तर त्यामुळे बाळ आत गुदमरू शकते,
• ‎डिलीव्हरीनंतर वार जर पूर्णपणे बाहेर आली नाही तर वार आत राहिली तरी जंतूसंसर्ग होऊ शकतो.
• ‎बाळंतपणानंतर न थांबणारा रक्तस्त्राव झाल्यास,
• ‎बाळंतपणानंतर सतत ताप असेल, रक्तदाब जास्त प्रमाणात वाढत असल्यास प्रसूतीच्या वेळी गुंतागुंत निर्माण होते अशावेळी डॉक्टरांना आई आणि बाळाचीही जास्त काळजी घ्यावी लागते.

बाळंतपणाच्यावेळी कळा सुरु झाल्यावर वैद्यकीय मदतीची गरज केव्हा लागते..?
अंगात जास्त ताप असणे, बेशुद्ध पडणे किंवा आकडी येणे, वार बाहेर पडण्यापूर्वी रक्तस्त्राव होणे, बाळंतपणाचा काळ 12 तासापेक्षा अधिक लांबणे. अशावेळी ताबडतोब वैद्यकीय मदत असावी लागते. यासाठी बाळंतपण हे नेहमी हॉस्पिटलमध्ये होणे गरजेचे असते.

प्रसूतीसंबंधी खालील माहितीही वाचा..
नॉर्मल डिलिव्हरी होत नसल्यास डॉक्टर सिझेरियन वैगेरे पध्दतीने प्रसूती कशी करतात.
प्रसूतीनंतर घ्यायची काळजी.
नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

– डॉ. सतीश उपळकर
CEO, हेल्थ मराठी नेटवर्क

© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.

Preterm labor signs and symptoms in Marathi


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.