पोषक आहार – तांदूळ :
जगातील बहुतांश लोकांच्या आहारात तांदळाचा समावेश असल्याने तांदूळ हे एक प्रमुख धान्य आहे. तांदूळ हा चवीस गोड असून शीत, स्निग्ध गुणाचे आहे. तांदूळ हे वृष्य, मूत्रल, तृष्णा नाशक, अल्पबद्धता उत्पन्न करणारे असते. नविन तांदुळ अम्लविपाकी असल्याने पित्त वाढवतो. तर जुना तांदुळ पचण्यास हलका असून पित्त वाढवत नाही यासाठी सहा महिने जुना तांदुळच खाण्यासाठी वापरावा.
तांदळाच्या कोंड्यामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. त्यामध्ये ब1 जीवनसत्वाचे प्रमाण असते. त्यामुळे हातसडीचा किंवा कमी पॉलिश केलेला तांदुळ खावा. जास्त पॉलिश केलेला पांढरा तांदूळ हा सत्वहिन असल्याने त्याचे सेवन करु नये.
तांदळातील पोषणतत्वे –
100 ग्रॅम तांदळातील पोषकघटक
कॅलरी | 345 |
प्रथिने | 6.9 ग्रॅम |
स्नेह पदार्थ | 0.5 ग्रॅम |
कर्बोदके | 78 ग्रॅम |
तंतुमय पदार्थ | 0 ग्रॅम |
खनिजे | 1 ग्रॅम |
कॅल्शियम | 10 मि.ग्रॅम |
लोह | 3 मि.ग्रॅम |
फॉस्फरस | 160 मि.ग्रॅम |
हे सुद्धा वाचा..
गव्हातील पोषक घटक
ज्वारीतील पोषक घटक
नाचण्यातील पोषक घटक
Rice nutrition contents info in Marathi.